शाळा परिसरात पक्ष्यासाठी दाणा-पाणी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:10 IST2021-04-10T21:17:25+5:302021-04-11T00:10:41+5:30
अंदरसुल : येथील सोनवणे शैक्षणिक संकुलात पक्ष्यांसाठी दाणा-पाणी हा उपक्रम शालेय आवारात अनेक ठिकाणी राबवण्यात आला. पक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारचे धान्य व पाणी एकाच ठिकाणी एकाच भांड्यात त्या भांड्यांची व्यवस्थित रचना करून शालेय आवारात सर्वत्र झाडांना टांगून व्यवस्था करण्यात आली.

शाळा परिसरात पक्ष्यासाठी दाणा-पाणी उपक्रम
अंदरसुल : येथील सोनवणे शैक्षणिक संकुलात पक्ष्यांसाठी दाणा-पाणी हा उपक्रम शालेय आवारात अनेक ठिकाणी राबवण्यात आला. पक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारचे धान्य व पाणी एकाच ठिकाणी एकाच भांड्यात त्या भांड्यांची व्यवस्थित रचना करून शालेय आवारात सर्वत्र झाडांना टांगून व्यवस्था करण्यात आली.
यावर्षी संपूर्ण भारतभर उष्णतेची तीव्रता जाणवत असून कडक ऊन पडले आहे. तसेच विहीरी, बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. नदी पात्रात पाणी आटले आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागते तसेच त्यांना पाणी व धान्य या दिवसात उपलब्ध होत नाही.
पक्ष्यांची पाण्याची व धान्य शोध भटकंती कमी व्हावी तसेच पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी व धान्य मिळावे अथवा ते उपलब्ध होवून त्यांचीजीवितहानी टळावी, तसेच पक्ष्यांमुळे निसर्गाचे संवर्धन व्हावे हा हेतू आहे.
निसर्ग व पर्यावरणाचा समतोल राखण्यास पक्षांची मदत होते. त्या अनुषंगाने सदर उपक्रम शैक्षणिक संकुलात कोविड १९ चे सर्व नियम पाळून राबविण्यात आला.
या उपक्रम राबविण्यासाठी प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापक जयश्री परदेशी, गणेश सोनवणे, दिपक खैरनार, शिवप्रसाद शिरसाठ, सुनील भोसले, वैभव पवार, म्हसू शिंदे,अक्षय खैरनार, रामदास गायके आदी उपस्थित होते.