बीज रूजलं रूजलं काळया आईच्या उदरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 09:34 PM2020-06-21T21:34:07+5:302020-06-22T00:01:02+5:30

वडनेर : सध्या पेरणी कामे अंतिम टप्यात आली आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने शेतशिवारी बिज पेरणी केली आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड काटवण परिसरात करण्यात आली आहे .

The seed took root in the womb of the black mother | बीज रूजलं रूजलं काळया आईच्या उदरात

मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी शिवारात सुरू असलेली पेरणी.

Next
ठळक मुद्देसमाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप पिकांच्या पेरणीची कामे सुर

वडनेर : सध्या पेरणी कामे अंतिम टप्यात आली आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने शेतशिवारी बिज पेरणी केली आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड काटवण परिसरात करण्यात आली आहे .
चांगले पीक पाणी येईल अशी आशा शेतकरी वर्गात आहे. बैल जोडीची संख्या कमालीची घटली असून बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणीची कामे उरकावली आहेत. वेळेची बचत होत असल्याने ट्रॅक्टरला जास्त प्रमाणात पसंती देण्यात आली आहे. पावसाचा अंदाज घेत गेल्या दोन आठवड्यापासून सुरू झालेली पेरणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या संचारबंदी असल्यामुळे व शाळांना अद्यापही सुट्ट्या असल्यामुळे परिवारातील सर्वच सदस्यांनी शेतहीवर्तत हजेरी लावत पेरणीची कामात सहभाग नोंदविला आहे. गाव शिवारातील पेरणीची व इतर कामे करताना सामाजिक अंतर राखले जात आहे. संचारबंदी नियमांना प्राधान्य देण्यात अग्रेसर ठरले आहेत. कामावर जाताना तोंडाला मास्क लावत तसेच स्करपचा वापर करत काळजी घेतली जात आहे. सध्या मका, बाजरीसह खरीप पिकांची पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. तरी आगाऊ पेरणी करण्यात आलेल्या मका व पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मका पिकाची पेरणी यंदा मोठ्या प्रमाणात वडनेरसह काटवण परिसरात करण्यात आली आहे. यामुळे मक्याचे क्षेत्र वाढले आहे.पाडळदे परिसरात पेरणीची कामे पूर्णपाडळदे : पाडळदेसह परिसरातील शेरूळ , हिसवाळ, कळवाडी देवघट भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप पिकांच्या पेरणीची कामे सुर केली आहेत. मान्सून पूर्व व मान्सूनचा पाऊस बºयापैकी झाला. परिसरात रोज रिमझिम होत असतो. काल वादळी वाºयासह जोरात पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. आठ दिवसापासून थोड्याफार प्रमाणात रोज पाऊस पडतो त्यामुळे पेरणीची कामे सुमारे ९८ टक्के पूर्ण झाली आहेत. आता कोळपणीला सुरु वात होईल. कपाशी, बाजरी ज्वारी व कडधान्य काही प्रमाणात मका इत्यादी पिकांची लागवड करण्यात आली आहे. येथील शेतकरी रोज सकाळी लवकर उठून आपली न्याहारी बांधून शेतामध्ये काम करताना दिसून येतो. सिंचनाची सोय नसल्याने पाहिजे तसं उत्पन्न घेता येत नाही. कारण परिसरातील संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस कधी जास्त कधी कमी कधी अवर्षणग्रस्त अशी परिस्थिती निर्माण होत असते. पाणी पातळीत वाढझालेल्या वादळी वाºयासह पावसामुळे येथील पाण्याची पातळी वाढण्यास चांगली मदत झाली आहे. शेतकरी थोडयाफार प्रमाणात आपल्या शेतीला सिंचन ही करू शकतो. परिसरात पूर्वापार चालत आलेली पद्धतच शेतकरी राबवताना दिसून येतो. त्यामुळे अधिकच कष्ट करावे लागतात. आधुनिक शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे त्यामुळे उत्पन्नात अधिक भर पडू शकते पण तसे करतांना येथील शेतकरी अजून दिसून येत नाही. फक्त १५ ते २० टक्के शेतकरी ठिबकचा वापर करताना दिसून येतो.

Web Title: The seed took root in the womb of the black mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.