सुरक्षारक्षकाने चोरली कंपनीतील कॉईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 19:34 IST2018-11-17T18:10:32+5:302018-11-17T19:34:21+5:30

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील तीनशे किलो लोखंडाच्या कॉईल चोरी प्रकरणी पोलिसांनी संदीप शिरसाठ (४०) या सुरक्षारक्षकाच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़

The security guard cobbled the stolen company | सुरक्षारक्षकाने चोरली कंपनीतील कॉईल

सुरक्षारक्षकाने चोरली कंपनीतील कॉईल

ठळक मुद्देसातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील तीनशे किलो लोखंडाच्या कॉईल चोरी प्रकरणी पोलिसांनी संदीप शिरसाठ (४०) या सुरक्षारक्षकाच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़

विपलकुमार कर्तार भुतानी (रा. उषाकिरण को-आॅपरेटीव्ह सोसायटी, सिटी सेंटर मॉलसमोर, नाशिक) यांनी सातपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील एस अ‍ॅण्ड एस वॉटर प्रॉडक्ट कंपनीत संदीप शिरसाठ हा सुरक्षारक्षकाचे काम करतो़ ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत संशयित शिरसाठ याने कंपनीतील ४१ हजार ४१८ रुपयांच्या ३०० किलो वजनाच्या लोखंडी तारांच्या १२ कॉईल (कच्चा माल) चोरून नेल्या.

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: The security guard cobbled the stolen company