शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी उद्या दुसरी गुणवत्ता यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:38 IST

नाशिक : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली अकरावी प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, ...

नाशिक : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली अकरावी प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, दुसऱ्या फेरीसाठी शनिवारी (दि. ५) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयापूर्वी एसइबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या २१३ विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला असून, उर्वरित ३८६ विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवगार्तून प्रवेश घ्यावा लागणार आहे. परंतु, प्रवेशप्रक्रियेनंतर न्यायालयातील स्थगिती उठल्यास आपल्या आरक्षणाचे काय होणार या विचाराने एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.

नाशिक शहरात अकरावीच्या २५ हजार २७० जागा उपलब्ध असून पहिल्या फेरीत ८ हजार १८० जागा भरल्या आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने अकरावीची प्रवेशप्रक्रिया रखडली होती. मात्र न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर प्रवेशप्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून, शहरातील ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. मात्र न्यायालयाच्या निर्देशांनुसार, एसइबीसी कोट्यातून प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या ३६८ घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे. दरम्यान, शहरातील ६० कनिष्ठ महाविद्यालयांतील २० हजार ६१६ जागांसाठी पहिली गुणवत्ता जाहीर झाली. यात ८ हजार ४८५ विद्या र्थ्यांची निवड झालेली नाही. त्यांना पुढील गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागेल. आतापर्यंत ३१ हजार ४० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केला आहे. त्यापैकी २५ हजार ४७५ विद्यार्थ्यांचे अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. तर २२ हजार २४९ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पर्याय निवडले आहेत. आता दुसऱ्या फेरीत १७ हजार ९० जागांसाठी २३ हजार ३९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आहेत.

इन्फो-अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

- ५ डिसेंबर : दुसऱ्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.

- ५ ते ९ डिसेंबर : विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेणे.

- १० डिसेंबर : तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा अहवाल सादर करणे.