शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

फेरतपासणी : औषधनिर्माण-तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना धक्का

By admin | Updated: August 23, 2016 00:08 IST

...थेट ७५ टक्क्यांपर्यंत गुणवाढ

नाशिक : औषधनिर्माणशास्त्र व तंत्रनिकेतनच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या फेरतपसाणीमध्ये थेट ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत जादा गुण मिळाल्याने धक्काच बसला आहे. यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी करणारे परीक्षक अपात्र आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.तंत्रशिक्षण मंडळाच्या नियमानुसार औषधनिर्माणशास्त्र व तंत्रनिकेतन शाखेच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची पुन:तपासणी करावयाची झाल्यास केवळ दोनच विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या प्रतींची मागणी करता येते. औषधनिर्माण अभ्यासक्र मासाठी प्रथम वर्षासाठी सहा लेखी व पाच प्रात्यक्षिक असे एकूण अकरा विषय आहेत. शंभरपैकी प्रत्येकी चाळीस गुण मिळाल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो. तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षा नियमावली २०११ नुसार अकरा विषयांपैकी तीन विषय अनुत्तीर्ण असल्यास तो विद्यार्थी एटीकेटीस पात्र ठरतो, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात विषयाच्या नियमांतील संशयास्पद वर्णनामुळे सहा लेखी विषय असताना दोनच विषयांना सध्या एटीकेटी दिली जाते. या चुकीच्या नियमांचा फटका बसून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, लेखी व प्रात्यक्षिक मिळून तीन विषयांमध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण असले तरीदेखील विद्यार्थ्याला एटीकेटी मिळायला हवी, अशी मागणी पालक राजेश बूब यांनी केली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जानुसार उत्तरपत्रिकेच्या आलेल्या छायाप्रती व त्यानंतर आलेले निकालांची तुलना करता गुणदानामध्ये दोष असल्याचे सहज लक्षात येते. त्यामुळे परीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)