दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य वाटप

By Admin | Updated: July 28, 2014 00:49 IST2014-07-27T23:20:53+5:302014-07-28T00:49:58+5:30

दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य वाटप

School Literature Distribution by Durgvir Pratishthan | दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य वाटप

दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य वाटप

 

सटाणा : गड-किल्ले संवर्धन करणारी मुंबई येथील दुर्गवीर प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत बागलाणमधील आदिवासी पट्ट्यातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
येथील यशवंतराव महाराज मंगल कार्यालयात दप्तर वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार आश्विनीकुमार पोतदार, पोलीस निरीक्षक भागवत जायभावे, जगदीश कुलकर्णी, नगराध्यक्ष सुलोचना चव्हाण, ट्रस्टी दादाजी सोनवणे, बाबुलाल मोरे, अरविंद सोनवणे उपस्थित होते. यावेळी बागलाण तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील अजंदे, खरड, कांद्याचा मळा, बोरदैवत, माळेआंबा, हनुमंतपाडा, केरसाणे, जामनेसपाडा, पिंगळवाडे, चौगाव, खालप, ब्राह्मणगाव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हासूरकर, सदस्य अजित राणे, नितीन पाटोळे, प्रशांत वाघरे, सचिन रेडेकर, उमेश परब, देवेश सावंत यांनी त्यासाठी सहकार्य केले. संतोष हासुरकर म्हणाले की, बागलाण तालुक्याला इतिहासाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत मोठी लढाई याच भूमीत केली व त्यांच्या पदस्पर्शानी पावन झालेल्या या भूमीला ऐतिहासिक ठेव्यांची मोठी परंपरा लाभली आहे. ते जनत करण्यात आले तर बागलाण या भूमीत पर्यटन क्षेत्र निर्माण होऊ शकते त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.(वार्ताहर)

Web Title: School Literature Distribution by Durgvir Pratishthan