शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

शाळा बंद, मात्र तरीही इमारतींचे बांधकाम सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:06 IST

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत असल्याने गेल्यावर्षी शाळेचे एकत्रीकरण करण्यात आले. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांच्या इमारती संस्थेकडे वर्ग करण्यात आल्या असून त्या मिळकत विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत.

नाशिक : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत असल्याने गेल्यावर्षी शाळेचे एकत्रीकरण करण्यात आले. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांच्या इमारती संस्थेकडे वर्ग करण्यात आल्या असून त्या मिळकत विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. आता पुन्हा दुसरीकडे इमारती बांधण्यासाठी १३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, तशी तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.महापालिकेच्या प्राथमिक शाळा आधी शिक्षण मंडळाद्वारे चालविल्या जात होत्या, आता मात्र त्या महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालवल्या जात आहेत. शाळांची प्रगती हा वादाचा विषय असला तरी खासगी शाळांच्या तुलनेत या शाळा टिकत नसल्याने विद्यार्थी गळती कायम आहे. त्याचा परिणाम म्हणून पूर्वी ५५ हजारांच्या संख्येत असलेल्या विद्यार्थी संख्येत कमालीची घट होऊन आता जेमतेम २७ हजार विद्यार्थी शिकत आहेत. अनेक शाळा चालविण्यासाठी शहरातील सेवाभावी संस्थांनी महापालिकेला मदत केली. विद्यार्थी आणून बसवले, परंतु ते टिकून ठेवणे महापालिकेला गेल्या काही वर्षांत शक्य झालेले नाही. त्यामुळे गेल्या वर्षी अनेक शाळांचे एकत्रीकरण करण्यात आल्या असून, १२७ शाळांची संख्या ९० वर आणण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शाळा इमारती रिक्त झाल्या असून शिक्षण विभागाने त्या मिळकत विभागाकडे सुपुर्द केल्या आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभाग आता दुसऱ्या खासगी शाळांना या इमारती चालविण्यासाठी देण्याच्या प्रयत्नात आहे. एकीकडे आहे त्या शाळा बंद करण्यात आल्या आणि आता नव्याने काही शाळा इमारती बांधण्यासाठी १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आहे त्या शाळा बंद करण्याची घाई कशाला होती? असा प्रश्न पडतो. शहराच्या मध्यवर्ती महापालिकेची बी. डी. भालेकर शाळेची इमारत असून, येथील माध्यमिक शाळा बंद पडल्याने अनेक राजकीय नेते आणि विकासकांचा डोळा आहे. काही शिक्षण संस्थादेखील इमारत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.केवळ इमारत बांधून विद्यार्थी वाढतील?महापालिकेच्या शाळेच्या परिसरात सुविधा देणे आवश्यकच आहे त्याविषयी कोणाचे दुमत असणार नाही मात्र केवळ इमारतींवर १३ कोटी खर्च करून विद्यार्थी संख्या वाढेल काय? हा प्रश्न आहे. शिक्षणाचा दर्जा स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी मात्र अंदाजपत्रकात अल्प तरतूद आहे. उलट माजी आयुक्तांनी डिजिटल शाळा सुरू करण्यासाठी ११ कोटी रुपयांची तरतूद केली होती त्यातून खासगी शाळांना स्पर्धा करता येईल, अशी यंत्रणा उभारणे शक्य होते, परंतु या अंदाजपत्रकात ही योजना गुंडाळून अवघ्या पन्नास लाख रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प