शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

By admin | Updated: March 20, 2015 00:08 IST

प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

येवला : नांदगाव तहसीलदारांसह मनमाड मंडलाधिकारी यांच्या अंगावर वाळूचा डंपर घालून जिवे मारण्याच्या प्रयत्नांनंतर वाळूमाफियांची मजल थेट प्रांताधिकाऱ्यांनाच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत गेली आहे.प्रांताधिकारी वासंती माळी यांना शहरातील वाळूमाफियांनी जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करण्याचा प्रकार मंगळवारी घडला. येवला शहर पोलीस ठाण्यात या घटनेवरून रात्री उशिरा फिर्याद दाखल झाली. माळी या शासकीय वाहनाने भारम येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ काढण्याचा कार्यक्र म आटोपून येवल्याला परत येत असताना त्यांना कोटमगाव शिव रस्त्यावरून नंबरप्लेट नसलेला वाळूचा डंपर दिसला. त्यांनी तो डंपर थांबवून वाहतुकीचा परवाना व रॉयल्टीच्या कागदपत्रांची मागणी चालकाकडे केली असता त्याने मालकाला बोलावून घेतले. त्यानंतर डंपर मालक किशोर परदेशी व बंटी परदेशी हे तेथे आले. त्यांनी प्रांताधिकारी यांना धमकी देऊन शिवीगाळ करण्यास सुरु वात केली. किशोर परदेशी यांनी चालकाला तू गाडी घेऊन निघ मी पाहतो अशी असभ्य भाषा वापरत प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीचालकाला धक्काबुक्की केली. डंपरमधील सुमारे सहा ब्रास अवैधरीत्या वाहतूक केलेली वाळू रस्त्यावर टाकून चालक फरार झाला. वाहनचालक ज्ञानेश्वर रामचंद्र डंबाळे, रा. हुडको कॉलनी यांच्या फिर्यादीवरून वाळूचे अवैध उत्खनन, सरकार कामात अडथळा आणणे तसेच सरकारी व्यक्तीस जिवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा भादंवि ३९२, ३७९, ३४१, १८८, ५०४, ५०६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८ प्रमाणे व गौणखनीज कायदा कलम ४ प्रमाणे किशोर परदेशी, बंटी परदेशी व डंपरचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)