सटाणा पोलिसांनी केल्या दुचाकी हस्तगत; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:26 IST2018-11-24T01:25:49+5:302018-11-24T01:26:16+5:30

सटाणा येथील पोलिसांनी शिताफीने पकडलेल्या दुचाकी चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. दुचाकी चोरट्यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Satana police gets two-wheeler; Both arrested | सटाणा पोलिसांनी केल्या दुचाकी हस्तगत; दोघांना अटक

सटाणा पोलिसांनी पकडलेले दोन दुचाकी चोर व जप्त केलेल्या दुचाकी. समवेत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस कर्मचारी.

सटाणा : येथील पोलिसांनी शिताफीने पकडलेल्या दुचाकी चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. दुचाकी चोरट्यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सटाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, योगेश गुंजाळ, केशव सूर्यवंशी, योगेंद्र शिसोदे यांच्या पथकाने नंदुरबार येथून योगेश शंकर गवळे, युवराज साहेबराव गवळे (दोघे, रा. खुडाणे, ता. साक्री, जिल्हा धुळे) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसीखाक्या दाखविताच सटाणा शहरातून हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर, बजाज कंपनीची डिस्कव्हर या दोन दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी सटाणा पोलिसांत दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या चोरट्यांमुळे दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Satana police gets two-wheeler; Both arrested