नाशिक : दिल्ली येथील अर्धमॅरेथॉन स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने प्रथम, तर मोनिका आथरे हिने तिसरा क्रमांक मिळविला. नाशिकच्या आंतरराष्टÑीय धावपटू संजीवनी आणि मोनिका यांनी देशांतर्गत मॅरेथॉन स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखत दिल्ली मॅरेथॉन स्पर्धाहीगाजविली.संजीवनीने १:१३:५८ सेकंदाची वेळ नोंदवत दिल्ली मॅरेथॉन जिंकली, तर मोनिकाने १:१६:५५ सेकंद वेळ नोंदवत तिसरा क्रमांक मिळविला. २०१६ मध्ये मोनिका आथरे हिने दिल्ली मॅरेथॉन जिंकली होती, तर संजीवनी दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. २०१७ मध्ये एशियन स्पर्धेच्या निवडीसाठीची प्रक्रिया सुरू असल्याने दोघींनीही सहभाग नोंदविला नव्हता.एक वर्षाचा खंड पडूनही त्यांनी या स्पर्धेत पुन्हा नाशिकचा दबदबा कायम राखला. त्यांच्या यशाचे महिंद्रा अॅन्ड महिंद्रा तसेच नाशिक जिल्हा अॅथलेटिक्सकडून कौतुक करण्यात आले.
संजीवनी दिल्ली मॅरेथॉन विजेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:58 IST
दिल्ली येथील अर्धमॅरेथॉन स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने प्रथम, तर मोनिका आथरे हिने तिसरा क्रमांक मिळविला. नाशिकच्या आंतरराष्टÑीय धावपटू संजीवनी आणि मोनिका यांनी देशांतर्गत मॅरेथॉन स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखत दिल्ली मॅरेथॉन स्पर्धाही गाजविली.
संजीवनी दिल्ली मॅरेथॉन विजेती
ठळक मुद्देमोनिका आथरे हिने मिळविला तिसरा क्रमांक