Sanjay Sathe is the taluka of the Maharashtra State Onion Producers Farmers Association | महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संजय साठे
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संजय साठे

ठळक मुद्देसंघटना फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आली

चांदोरी : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या निफाड तालुका अध्यक्षपदी नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय बाळकृष्ण साठे यांची नियुक्ती करण्यात आली. सघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या हस्ते साठे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना ही राजकीय संघटना नसून ही फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली असून शेतकरी पाच ते सहा महिने शेतात राबवून कांदा पिक पिकवितो, त्यासाठी त्यांच्या कुटुंबातील लहान, थोर, घरातील सर्वच सदस्य राबतात.
परंतु कांदा मात्र एका दिवसात कवडी मोल भावात विकावा लागतो. किंवा उकीरड्यावर फेकावा लागतो. तसे होऊ नये म्हणून कष्टाने पिकविलेल्या मालाचे मोल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, म्हणून ही संघटना राज्यभर जनजागृती करणार असल्याचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे यांनी यावेळी सांगितले.
नियुक्ती पत्र देताना दिपक बोचरे, भाऊलाल गिते, सोमनाथ कानमहाले, दिलीप घायाळ, नाना कोटकर, योगेश अडसरे व आदी कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
 

Web Title: Sanjay Sathe is the taluka of the Maharashtra State Onion Producers Farmers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.