शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत आज नाशकात, तीन दिवस मुक्काम; भुजबळही नाशिकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 12:38 PM2022-07-07T12:38:06+5:302022-07-07T12:38:45+5:30

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ हेदेखील नाशिकमध्ये दाखल झाले असून शनिवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत संवाद साधणार आहेत.

Sanjay Raut is in Nashik today for Shiv Sena's damage control Bhujbal also in Nashik | शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत आज नाशकात, तीन दिवस मुक्काम; भुजबळही नाशिकमध्ये

शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत आज नाशकात, तीन दिवस मुक्काम; भुजबळही नाशिकमध्ये

Next

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील दोन शिवसेना आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये आज रात्री येणार असून ते तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ हेदेखील नाशिकमध्ये दाखल झाले असून शनिवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत संवाद साधणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये नाशिकमधून माजी कृषी मंत्री आमदार दादा भुसे आणि आमदार सुहास कायंदे हे दोघे सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात हे दोनच शिवसेनेचे आमदार आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता असून डॅमेज कंट्रोल करून पक्ष एकसंघ राखण्यासाठी संजय राऊत नाशिकमध्ये येणार आहेत. कार्यकर्त्यांशी ते व्यक्तिगत चर्चा करणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, माजी पालकमंत्री छगन भुजबळ हेदेखील नाशिकमध्ये दाखल झाले असून शनिवारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक बोलावली आहे त्यात ते संवाद साधणार आहेत.
 

Read in English

Web Title: Sanjay Raut is in Nashik today for Shiv Sena's damage control Bhujbal also in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.