Sanitizer intake is recommended | सॅनिटायझर  सेवन बेतले जिवावर

सॅनिटायझर  सेवन बेतले जिवावर

इंदिरानगर : निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर प्राशन केल्याने इंदिरानगर भागातील एका पुरुषाला प्राणाला मुकावे लागण्याची घटना घडली आहे. अविनाश मोरे (३९) असे त्यांचे नाव आहे. 
कोरोनाचा वाढत असल्यामुळे हातांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची ठरत असून वारंवार हात स्वच्छ ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. वडाळा पाथर्डी रस्त्यावर असलेल्या श्रीगणेशाय अपार्टमेंटमधील अविनाश मोरे यांना गेल्या रविवारी (दि.४) छातीत दुखू लागल्याने त्यांनी राहत्या घरी सॅनिटायझरचे सेवन केले. यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने  त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचार सुरु असताना शनिवारी (दि.१७) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी नोंद केली आहे.

Web Title: Sanitizer intake is recommended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.