नाशिकच्या संयामी खेरला पदार्पणातच फिल्मफेअर

By Admin | Updated: October 27, 2016 00:39 IST2016-10-27T00:36:44+5:302016-10-27T00:39:18+5:30

नाशिकच्या संयामी खेरला पदार्पणातच फिल्मफेअर

Samemi Kher of Nashik Filmfare debut in Filmfare | नाशिकच्या संयामी खेरला पदार्पणातच फिल्मफेअर

नाशिकच्या संयामी खेरला पदार्पणातच फिल्मफेअर

नाशिक : बॉलिवूडमध्ये मिर्झीया चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या नाशिकच्या संयामी खेरने आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून फिल्मफेअर मिळविले आहे. चित्रपटातील तिच्या लक्षवेधी पेहरावातून फॅशन आयकॉन ठरू पाहणाऱ्या फिल्मफेअर ग्लॅमर अ‍ॅण्ड स्टाइल अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.
फिल्मफेअरचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्यात महानायक अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अलिया भट, जॅकलीन फर्नांडीस यांच्या बरोबरीने संयमीचा गौरव करण्यात आला. इमर्जिंग फेस अ‍ॅण्ड फॅशन इन बॉलिवूड असा संयामीचा विशेष उल्लेख करण्यात आला.
मूळ नाशिककर असलेल्या संयामीला राकेश मेहरा प्रॉडक्शनचा मोठा चित्रपट स्टार पुत्र हर्षवर्धन कपूर बरोबर मिळाला. तिच्या फिल्मफेअर पुरस्कारामुळे नाशिककरांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Samemi Kher of Nashik Filmfare debut in Filmfare