शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विषय समितीसाठी पक्षांच्या आघाडीवर सामसूम

By admin | Updated: September 26, 2014 23:41 IST

विषय समितीसाठी पक्षांच्या आघाडीवर सामसूम

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांची निवड ४ आॅक्टोबरला होऊ घातली असली, तरी सर्वच पक्षांच्या आघाडीवर सामसूम असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या २ आॅक्टोबरला माघारी झाल्यानंतरच जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे.जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदासाठी ४ आॅक्टोबरला निवडणूक होत असून, त्यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्यांना सभेची पत्रेही पाठविण्यात आली आहेत. २१ सप्टेंबरला झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या आघाडीत बिघाडी होऊन राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सरळ सरळ कॉँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत केले होते. त्यावेळी कॉँग्रेसच्या नेत्यांनी व निरीक्षकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता मधल्या काळात कॉँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे भाजपात गेल्याने त्यांचे चार समर्थक सदस्य काय भूमिका घेतात, याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे कळवण येथील कॉँग्रेसच्या महिला सदस्याच्या पतिराजाला भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा असल्याने कॉँग्रेसचे संख्याबळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या गोटात कमालीची शांतता असून, त्यांच्या सदस्यांचे राष्ट्रवादीच्या सदस्य पदाधिकाऱ्यांशी असलेली सलगी पाहता या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही सेना तटस्थ राहिल्यास राष्ट्रवादीच्या झोळीत सर्व चारही विषय समिती सभापतिपदे पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)