साठ महान आदर्श व्यक्तींना काव्य रचनेतून मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:43+5:302021-02-05T05:45:43+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य निर्मितीला ६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सागरमल मोदी शाळेच्या शिक्षिका विजया दुधारे यांनी लिहिलेल्या ...

साठ महान आदर्श व्यक्तींना काव्य रचनेतून मानवंदना
नाशिक : महाराष्ट्र राज्य निर्मितीला ६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सागरमल मोदी शाळेच्या शिक्षिका विजया दुधारे यांनी लिहिलेल्या ‘हिरेजडीत महाराष्ट्र’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव पाटील होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून नायक दीपचंदसिंह, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र निकम, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, सनय प्रकाशनचे संचालक शिवाजी शिंदे, संग्राम करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना बोरस्ते यांनी काव्यातून आदर्श व्यक्तींची महती लिहिणे म्हणजे खूप अवघड कार्य असल्याचे सांगितले. ज्यांच्याकडे शब्द संपत्तीचे भांडार आहे, अशीच व्यक्ती नावातील प्रत्येक शब्दातून मानवंदना देण्याचे कार्य करू शकते, असेही त्यांनी नमूद केले. विजया दुधारे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी केले. आभार दीपक निकम यांनी मानले. पाहुण्यांचे स्वागत विलास पाटील, मधुकर देशमुख, अर्जुन वेलजाळी, निवृत्ती दुधारे, नारायण दुधारे यांनी मानले. प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत विलास पाटील, मधुकर देशमुख, अर्जुन वेलजाळी, निवृत्ती दुधारे, नारायण दुधारे यांनी केले.
फोटो
३०पुस्तकप्रकाशन