पंचवटीत नायलॉन मांजाची चोरीछुपे विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:59 AM2018-12-22T00:59:42+5:302018-12-22T01:00:07+5:30

मकरसंक्रातीला २० ते २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असून संक्रांतीचे खास आकर्षण म्हणून पतंगोत्सव साजरा करताना वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांजावर शासनाने बंदी घातली असली तरी, पंचवटी परिसरात चोरीछुप्यापद्धतीने सर्रास नायलॉन मांजाची विक्री केली जात असून, महापालिका, पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.

 The sale of stolen pieces of Nylon masja in Panchvati | पंचवटीत नायलॉन मांजाची चोरीछुपे विक्री

पंचवटीत नायलॉन मांजाची चोरीछुपे विक्री

Next

पंचवटी: मकरसंक्रातीला २० ते २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असून संक्रांतीचे खास आकर्षण म्हणून पतंगोत्सव साजरा करताना वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांजावर शासनाने बंदी घातली असली तरी, पंचवटी परिसरात चोरीछुप्यापद्धतीने सर्रास नायलॉन मांजाची विक्री केली जात असून, महापालिका, पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
दरवर्षी पतंग उडवितांना वापरण्यात येत असलेल्या नायलॉन मांजामुळे पक्षी, रस्त्याने ये-जा करणारे नागरिक विशेषत: लहान मुले गंभीर जखमी होण्याच्या घटना घडतात. नाशिक शहरात सर्वत्र अशाप्रकारे पक्षी तसेच नागरिक जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री व वापरण्यावर गेल्या काही वर्षांपासून बंदी घातली आहे. मात्र पंचवटी परिसरात असलेल्या काही दुकानात सर्रासपणे चोरीछुप्यापद्धतीने नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. एकीकडे नायलॉन मांजा वापरू नका असे प्रशासनाकडून सुचविले असले तरी दुसरीकडे पतंग विक्री करणाºया व्यावसायिकांकडून सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री करण्यात येऊन नागरिकांच्या जीविताकडे दुर्लक्ष केले जात आहे. या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष झाल्याने प्रशासन अनभिज्ञ असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
दुकाने सज्ज
मकरसंक्रांतीला तीन आठवडे शिल्लक असून तत्पुर्वीच पतंग व मांजा विक्रीची दुकाने सज्ज झालेली आहेत. पंचवटी तसेच मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया भद्रकाली, रविवार कारंजा या परिसरातील अनेक पतंग विक्रेते नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Web Title:  The sale of stolen pieces of Nylon masja in Panchvati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक