शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना बनावट ई-पासची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:22 IST

नाशिक : जिल्ह्यातून परजिल्ह्यात वा परप्रांतात जाण्यासाठी प्रत्येकाला प्रशासनाकडे आॅनलाइन नोंदणी करून परवाना प्राप्त करून अनिवार्य करून घेण्यात आले असून, त्यासाठी नागरिकांची सुरू असलेली धडपड व असाहय्यता लक्षात घेऊन काही महाभागांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून बनावट ई-पास विक्रीचा धंदा जोरदार सुरू केल्याचे वृत्त आहे. या संदर्भात पोलीस चौकशी करीत असल्याचे सांगण्यात येते.

नाशिक : जिल्ह्यातून परजिल्ह्यात वा परप्रांतात जाण्यासाठी प्रत्येकाला प्रशासनाकडे आॅनलाइन नोंदणी करून परवाना प्राप्त करून अनिवार्य करून घेण्यात आले असून, त्यासाठी नागरिकांची सुरू असलेली धडपड व असाहय्यता लक्षात घेऊन काही महाभागांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून बनावट ई-पास विक्रीचा धंदा जोरदार सुरू केल्याचे वृत्त आहे. या संदर्भात पोलीस चौकशी करीत असल्याचे सांगण्यात येते.लॉकडाउन व संचारबंदीतून केंद्र व राज्य सरकारने काही प्रमाणात शिथिलता देत जागोजागी अडकून पडलेले नागरिक, मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची मुभा दिली आहे. विशेष करून परप्रांतीय मजुरांना रेल्वे व एसटी बसच्या माध्यमातून त्या त्या राज्याच्या सीमेवर सोडण्यात आले असून, काहींची नोंदणी केली जात आहे. परप्रांतीयांप्रमाणेच राज्यांतर्गतदेखील मोठ्या प्रमाणावर नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून अडकून पडले आहेत. त्यांनाही आपापल्या घरी परतीचे वेध लागले असले तरी, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून, अशा नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून प्रवासाचा पास घेणे व त्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रारंभी महसूूल विभागाकडे असलेली ही जबाबदारी नंतर पोलीस दलाकडे सोपविण्यात आली व त्यासाठी आॅनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने शिथिलता दिल्यामुळे मूळ गावी परतण्यास इच्छुकांची संख्या लाखोंच्या घरात असून, त्यासाठी त्यांना आॅनलाइन नोंदणी करणे जिकरीचे जात आहे. त्यातही अनेक नागरिक या नोंदणीबाबत अनभिज्ञ असल्यामुळे ते प्रशासनाच्या दारात चकरा मारत आहेत. मात्र त्याचाही गैरफायदा काही महाभाग उचलत असून, ई-पास मिळवून देण्याच्या नावाखाली हजार ते पाचशे रुपयांची आकारणी करून उखळ पांढरे करून घेतले आहे, तर संगणक निरक्षर असलेल्या नागरिकांची नोंदणी करून देण्यासाठी सायबर कॅफेचालकांनीही दोनशे ते तीनशे रुपये आकारून लूट चालविली असताना आता चक्क प्रशासनातील अधिकाºयांच्या नावे बनावट पास देऊन शासनाची व नागरिकांचीही फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अर्थात हा पासदेखील पैसे घेऊनच वितरीत केला जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक