शस्त्राचा धाक दाखवून लूट

By Admin | Updated: September 4, 2014 00:52 IST2014-09-04T00:49:07+5:302014-09-04T00:52:14+5:30

शस्त्राचा धाक दाखवून लूट

Robbery with weapons | शस्त्राचा धाक दाखवून लूट

शस्त्राचा धाक दाखवून लूट


नाशिक : मालेगाव येथील एका इसमाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना महामार्गावरील छान हॉटेल ते दीपालीनगर परिसरात घडली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, भाऊसाहेब किसन भडांगे (५०) हे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास छान हॉटेलपासून दीपालीनगरकडे जात असताना नागसेनवाडी येथील संशयित सिकंदर व त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना अडवले़
भडांगे यांना मारहाण करून शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील २ हजार ७०० रुपये हिसकावून घेतली़ या प्रकरणी भडांगे यांनी दिलेल्या फि र्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Robbery with weapons