खिडकी तोडून सव्वातीन लाखांची घरफोडी-नाशकातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 17:15 IST2019-11-03T17:11:58+5:302019-11-03T17:15:06+5:30
नाशिक शहरात दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तीपथक, बीटमार्शलसह अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

खिडकी तोडून सव्वातीन लाखांची घरफोडी-नाशकातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नाशिक : शहरात द्वारका परिसरात बंद घराची खिडकी तोडून सव्वातील लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गडली असून रविशंकर मार्ग परिसरात खिडकीचे गज वाकवून तीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला. तर गंगापूर भागात उघड्या घरातून 50 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती रविवारी (दि.3)समोर आली आहे. शहरात दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तीपथक, बीटमार्शलसह अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
पोलिासांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका परिसरात मरीमाता मंदीराशेजारी संतकबीर नगर येथे बंद घराची खिडकी तोडून चोरटयांनी तब्बल सव्वा तीन लाखांची घरफोडी केल्याची घटना घडली. याप्रकरणी दिनेश लक्ष्मण कल्याणी (२२) याने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी.इंगोले करीत या घरफोडीचा तपास करीत आहे. तर दुसऱ्या घटनेतही अशाचप्रकारे खिडकीचे गज कापुन घरात प्रवेश करीत चोरटयानी कपाटातील ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविशंकर मार्ग परिसरात घडली. याभागातील प्रभु कपिटल बिल्डीग शेजारी राहणार निखील चंद्रकांत लोहार ( २८) याने मुंबइ नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार सुहास क्षिरसागर या घरऱोडीचा तपास करीत आहे. गंगापूर, आनंदवल्ली परिसरात घडलेल्या तिसऱ्या घटनेत चोरटयांनी ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. सागरबाई बालाजी मुटकुळे ( २६) यांच्या उघडया पत्र्याच्या घरामध्ये घुसून टीव्हीवर ठेवलेला मोबाइल, पर्समधील सोन्याची पोत व रोख रक्कम असा एकूण ५० हजार रुपये किमचीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाइक बावीस्कर या प्रकरणाचा करीत आहे.