वडझिरेतील रस्ते बनले मृत्यूचे सापळे

By Admin | Updated: August 4, 2014 00:48 IST2014-08-03T20:00:56+5:302014-08-04T00:48:42+5:30

वडझिरेतील रस्ते बनले मृत्यूचे सापळे

Road to Waziristan creates death traps | वडझिरेतील रस्ते बनले मृत्यूचे सापळे

वडझिरेतील रस्ते बनले मृत्यूचे सापळे

 

वडझिरे: तालुक्यातील वडझिरे परिसरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली असून हे रस्ते जणू मृत्यूचे सापळे बनले आहेत. या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्याच्या नैऋत्य कोपऱ्यात असलेल्या वडझिरे गावाला जोडले जाणारे सर्वच रस्ते प्रचंड खराब झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या रस्त्यांची कामे झाली होती मात्र अल्पावधीतच त्यांची वाट लागली आहे. खराब रस्त्यामुळे दुचाकी घसरून अपघांचे प्रमाण वाढले आहेत. सिन्नर- वडझिरे हा रस्ता माळेगाव एमआयडीसी मार्गे जातो. पुढे ब्राम्हणवाडे मार्गे शिंदे येथे नाशिक - पुणे महामार्गाला जाऊन मिळतो. त्यामुळे नाशिक- पुणे महामार्गावर अपघात झाल्यास अथवा वाहतूक कोंडी झाल्यास या महामार्गावरील वाहतूक या रस्त्याने वळविली जाते. मात्र रस्ता खराब असल्याने मोठी वाहने जाऊ शकत नाही. गावाच्या परिसरात जे.व्ही.एस. नामक कारखाना सुरु झाला आहे. तसेच या भागात अनेक खडी क्रशर असल्याने या मार्गावरुन अनेक अवजड वाहने धावू लागली आहेत. या रस्त्याची वाहतूक क्षमता केवळ १० टनाची असून त्यावरुन सुमारे ३० ते ४० टनाचा बोजा वाहनारे शेकडो अवजड वाहने सध्या या रस्त्याने वाहतूक करीत आहेत. परिणामी वजनामुळे हा रस्ता ठिकठिकाणी खचला असून त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या साईडपट्ट्या खोल गेल्या आहेत. परिणामी त्यावर दुचाकी चालक घसरून गेल्या काही दिवसांता अनेक अपघात झाले असून अनेकांना दुखापतींना सामोरे जावे लागले आहेत. निवेदनावर सरपंच लता बोडके, उपसरपंच फकिरा दराडे, सुनील ठोंबरे, विलास बोडके, वसंत बोडके, अर्जुन बोडके, भास्कर गिते, आर. बी. बोडके, संजय बोडके, तुळशीराम ठोंबरे, शिवाजी बोडके आदींची नावे आहेत. (वार्ताहर)

Web Title: Road to Waziristan creates death traps