रस्ताच नसलेल्या गावाला श्रमजीवीने दाखविली ‘वाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 14:28 IST2017-12-13T14:27:57+5:302017-12-13T14:28:09+5:30
घोटी - इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाºया खैरे या आदिवासी वाडीला चिंचले या गावापर्यंत जोडण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावातील आदिवासी ग्रामस्थ वनविभागाच्या जंगलातून जंगली श्वापदाच्या भीतीच्या सावटाखाली स्वातंत्रपूर्व काळापासून पायपीट करावी लागत होती.या वाडीला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी रस्ता तयार करावा अशी मागणी येथील ग्रामस्थानी अनेकदा करूनही दखल घेतली नाही. अखेर श्रमजीवी संघटनेने एका आठवड्यात सुमारे तीन किलोमीटर अंतराचा रस्ता श्रमदानातून तयार करीत एक आदर्श निर्माण केला.

नाशिक, ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या हद्दीवर असणाºया इगतपुरी तालुक्यातील चिंचले खैरे या दोन आदिवासी वाड्यापैकी खैरे या वाडीला स्वातंत्र पूर्व काळापासून मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी रस्ता नव्हता.या दोन्ही वाड्याच्या मधील तीन किलोमीटर अंतराची जमीन वनविभागाच्या ताब्यात असल्याने रस्ता मंजूर करण्यास आण िरस्त्याचे काम करण्यास अडचणी येत होत्या.या वाडीला जोडण्यासाठी शासनाने रस्ता तयार करावा अशी मागणी येथील नागरिकांनी अनेकदा शासनाकडे केली होती.शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने रस्ता तयार होत नव्हता.
अखेर याबाबत श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी पुढाकार घेत स्थानिक युवकांना सोबत घेत श्रमदानातून या रस्त्याचे काम केले. दरम्यान वनविभागाच्या संभाव्य होणार्या कारवाईला न जुमानता श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या आठवड्यात तीन किलोमीटर अंतराचा रस्ता तयार केला.दरम्यान या रस्त्यामुळे या वाडीतील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न संपुष्टात आला आहे.शासनाने या कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर करावे अशी मागणी या वाडीतील ग्रामस्थानी केली आहे.