शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:38 IST

खेडलेझुंगे: नाशिक औरंगाबाद महामार्गावर बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याची पुर्ती चाळण झालेली आहे. त्यामुळे वाहनांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असल्याने वाहनचालकांमध्ये असंतोष पसराला आहे.

ठळक मुद्दे नाशिक-औरंगाबाद हायवेला पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालक त्रस्त


खेडलेझुंगे: नाशिक औरंगाबाद महामार्गावर बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याची पुर्ती चाळण झालेली आहे. त्यामुळे वाहनांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असल्याने वाहनचालकांमध्ये असंतोष पसराला आहे. या परिसरामध्ये अपघाती वळण व उंचवटा असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने चालकांची तारांबळ उडते. यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सततच्या पावसामुळे खड्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे खड्यांचा आंदाज येत नाही. त्यामुळे बऱ्याच वाहन चालकांना वाहनांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

अपघाती वळण आणि खड्डे यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. बोकडदरे येथील टेकड्यावर असलेली घनदाट झाडी, अपघाती वळणे आणि त्यातच या परिसरातील रस्त्याची खड्डे पडुन रस्त्याची झालेली चाळण यामुळे प्रवाशी मेटाकुटीला आलेली आहे. वाहनांना वेग असल्याने खड्यातुन वाहने हेलकावे घेतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदरील रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेवुन रस्त्यांवरील खड्डे बुजवावे असे शेतकरी, प्रवाशी व वाहन चालकांकडुन मागणी होत आहे.

नैताळे, बोकडदरे, निफाड, पिंपळस रामाचे या गावांमधुन जाणार्या नाशिक-औरंगाबद रस्त्याला झाडे लावण्यायेवढे खड्डे पडलेले आहे. सर्व रस्त्याची चाळण झाल्याने शेतकरी, प्रवाशी चालक यांना गाड्या चालविणे अत्यंत अवघड झाले आहे. ुसदरच्या रस्त्यांची तात्काळ दुरु स्ती होणे गरजेचे आहे. तरी सर्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दुरु स्ती कामे सुरु करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
े. ( 19 खेडलेझुंगेरोड)