शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागातील रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:11 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघात होत आहे. ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद या रस्त्यांकडे लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघात होत आहे. ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद या रस्त्यांकडे लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरेगाव ते डर्क इंडिया कंपनीपर्यंतचा रस्ता, एकलहरे शिवरस्ता, गंगावाडी ते कालवी, हिंगणवेढे-दारणासांगवी शिवरस्ता, एकलहरे सिद्धार्थनगर चाडेगाव व्हाया सामनगाव रस्ता, चाडेगाव जाखोरी व्हाया कोटमगाव मुख्य रस्ता, कोटमगाव ते ओढा जिल्हा प्रमुख मार्ग, ओढा ते दहावा मैल, सामनगाव ते आडगाव या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची डागडुजी न झाल्याने डांबर उखडून खडी उघडी पडली आहे. तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे मुश्किल झाले आहे.एकलहरे-हिंगणवेढे-सांगवी हा शिवरस्ता मळे भागातून जातो. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्र मण केल्याने अरुंद झाला आहे. दोन वाहने एका वेळी जाऊ शकत नाही, त्यामुळे वाहनचालकांमध्ये हमरी-तुमरी होते. हा रस्ता जिल्हा नियोजन मंडळ किंवा तत्सम यंत्रणेमार्फत दुरु स्त करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. एकलहरे गावापासून डर्क इंडिया कंपनीपर्यंतचा रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. रस्त्यावर मोठाले खड्डे पडून पाणी साचते. दरवर्षी मुरूम टाकून खड्डे बुजविण्यासाठी हजारो रु पये खर्च केले जातात. मात्र रस्ता पुन्हा ‘जैसे थे’ होतो. हा रस्ता वीज मंडळाच्या अखत्यारीत असल्याने सी.एस.आर. योजने अंतर्गत कॉँक्रि टीकरण करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाºया रस्त्याचीही प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. जुने सामनगाव ते आडगाव हा रस्ता नाशिक-औरंगाबाद, मुंबई-आग्रा व नाशिक-पुणे महामार्गाला मिळणारा ग्रामीण भागातील महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट असल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सोसावा लागत आहे. जुने सामनगाव, कोटमगाव, विंचूर गवळी ते आडगाव हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत आहे. या भागातील रहिवासी, ग्रामस्थ, शेतकरी यांना दररोज त्रास सहन करावा लागतो.चाडेगाव-सामनगाव रस्त्याचे काम संथचाडेगाव ते एकलहरे सिद्धार्थनगर व्हाया सामनगाव या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, हा रस्ता कधी पूर्ण होणार असा सवाल सामनगावकर एकमेकांना विचारत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाला आहे. रस्त्यावरील पाच ठिकाणच्या मोºयांचे काम व काही ठिकाणी खडी पसरून रस्ता सपाट करण्यात आला. मात्र सामनगाव ते एकलहरे गेटपर्यंत रस्त्याचे काम खोळंबले आहे. त्यामुळे सामनगावचे रहिवासी, शालेय विद्यार्थी, वाहनधारक, शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्ता खडबडीत झाल्याने अनेक दुचाकीचालक व पाठीमागे बसणाºया महिलांना पाठीचे व मणक्यांचे आजार जडले असल्याची महिलांची तक्र ार आहे. हा रस्ता त्वरित पूर्ण करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.पुलाचीही दुरवस्थाएकलहरे भागातील नागरिकांना जण्यासाठी ओढा गावाजवळ गोदावरी नदीवर फरशी वजा पूल बनविण्यात आला आहे. या पुलावरही पुराच्या पाण्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूने चढणीचा रस्ता आहे. तोही खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहनधारक जीव मुठीत धरून खड्डे चुकवत वाहने चालविण्याची कसरत करतात.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदroad transportरस्ते वाहतूक