शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते झाले उद्ध्वस्त

By admin | Updated: August 14, 2016 22:50 IST

रस्ते झाले उद्ध्वस्त

मनोज देवरे  कळवणकळवण तालुक्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आणि बिकट झाली असून, रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नाही. निचरा होण्यासाठी गटारी नाहीत. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्ते खचून गेल्याने चढउताराचे रस्ते तयार झाले आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाच दुचाकीवरून तालुक्यातील वाडी, पाडे, गाव, वस्ती, नगरे यांच्या रस्त्यावरून फिरवायला हवे अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असेही जयश्री पवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.ए. टी. पवार यांची संकल्पना आदिवासी, सर्वसामान्य शेतकरी व जनतेच्या विकासासाठी गावोगावी, खेड्यापाड्यांत वाडीवस्ती, शिवारपांधीपर्यंत रस्ते असणे गरजेचे आहे. रस्ते आणि रस्त्यारस्त्यांनी गावे जोडली गेल्यानंतर माणसे माणसांनी जोडली जातील, समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील हे लक्षात घेऊन माजी मंत्री ए. टी. पवार यांनी गाव तेथे रस्ता ही संकल्पना कळवण तालुक्यात साकारली. त्यामुळे रस्त्यांची सुधारणा, दुरु स्ती, खडीकरण व डांबरीकरण या कामांना प्राधान्य दिले गेल्याने गाव, वाड्या, वस्ती, पाडे, नगरे, शिवारपांधी यांना रस्त्यांनी जोडण्याचे महत्त्वाचे काम केले. कळवण तालुक्यात शेकडो किलोमीटर रस्त्यांची तसेच घाट कटिंग, नदी- नाल्यावर पूल, फरशीपूल आदि कामे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून करून रस्त्यांचे रूप बदलविण्याचे सारे श्रेय माजी मंत्री ए. टी. पवार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीला जाते.घाटातही दरड कोसळते...आदिवासी व दुर्गम भागातील महाल, जांभाळ, उंबरदे, शिरसा, पायरपाडा आदि आदिवासी गावे रस्त्यांनी जोडली गेल्याने आज संपूर्ण तालुका रस्त्यांनी जोडला गेला आहे. त्यामुळे आदिवासी, सर्वसामान्य व शेतकरी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत हे सत्य नाकारून चालणार नाही. सप्तशृंगगड ते नांदुरी हा रस्ता घाटकटिंग करून झाल्यानंतर तालुक्यात घाटकटिंग करून अनेक रस्ते झाल्याने अनेक गावे जोडली गेली. त्या घाटातदेखील दरडी कोसळल्याने रस्ते आज बंद झाले. घाटकटिंग रस्त्यांचे मातीकाम झाले मात्र खडीकरण व डांबरीकरण, मोरी कामे अजूनही न झाल्याने खडतर प्रवास आजही आदिवासी जनतेच्या नशिबात आहे. कळवण तालुक्यात गिरणा, पुनंद, बेहडी, तांबडी, धनोली आदि नद्यांवर तसेच ठिकठिकाणी नाल्यांवर रस्ता पुलांची उभारणी करून गावे रस्त्यांनी जोडली गेली. जनतेचा वेळ व पैसा वाचला, शिवाय त्यामुळे गावांचा विकास झाला, रूपदेखील बदलून गेले आहे. मात्र महाड येथील दुर्घटनेनंतर कळवण तालुक्यातील नदी-नाल्यांवरील किती पूल सुरक्षित आहेत याची तपासणी करण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. कोल्हापूर फाटा ते अभोणादरम्यान असलेल्या फरशीपुलाची पाहणी संबंधित विभागाने केली तर अवस्था काय झाली आहे हे दिसून येईल. नांदुरी ते सप्तशृंगीगड घाट रस्तादेखील खचला आहे. येथील गिरणा नदीवरील पुलावरून येणेजाणे धोकादायक ठरू पाहत आहे, अशी तक्र ार नागरिकांनी केली आहे. त्याची दखल घ्यायला संबंधित अधिकारी व विभागाला वेळ मिळत नाही का, असा सवाल आदिवासी जनतेने केला आहे.