शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

श्रीश्री रविशंकर मार्गावरील  झाडांना संरक्षणाअभावी वाढलेल्या धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:21 IST

महापालिकेने हरित नाशिक संकल्पना साकारण्यासाठी व शहरातील रिंगरोडवरील वृक्षतोडीचा मोबदला म्हणून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दहा फूट उंचीच्या २१ हजार रोपांच्या लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीकरिता श्रीश्री रविशंकर दिव्य मार्गाच्या दुतर्फा कदंब, टॅबोबिया या प्रजातीच्या रोपट्यांची लागवड केली गेली. या मार्गावरील बहुसंख्य झाडांची चांगली दमदार वाढ झाली आहे; मात्र संरक्षणाअभावी वाढलेल्या झाडांना धोका उद्भवला असून, काही झाडांची हानी होत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.

नाशिक : महापालिकेने हरित नाशिक संकल्पना साकारण्यासाठी व शहरातील रिंगरोडवरील वृक्षतोडीचा मोबदला म्हणून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दहा फूट उंचीच्या २१ हजार रोपांच्या लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीकरिता श्रीश्री रविशंकर दिव्य मार्गाच्या दुतर्फा कदंब, टॅबोबिया या प्रजातीच्या रोपट्यांची लागवड केली गेली. या मार्गावरील बहुसंख्य झाडांची चांगली दमदार वाढ झाली आहे; मात्र संरक्षणाअभावी वाढलेल्या झाडांना धोका उद्भवला असून, काही झाडांची हानी होत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.सुमारे २१ हजार रोपांच्या लागवडीचे जणू अभियान मनपाकडून वर्षभरापूर्वी राबविले गेले. मनपाने नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी जेसीबीद्वारे खड्डे घेऊन दहा फुटांची रोपे लावली. रविशंकर दिव्य मार्गालगतही अशाप्रकारे रोपे लावली गेली. पावसाळ्यामुळे येथील काही रोपांनी तगही धरल्याने रोपे सध्या हिरवीगार दिसत आहे; मात्र काही रोपांनी मान टाकली आहे, तर काही रोपे जनावरांनी कुरतडल्याने नाहीशी झाली आहे. पाच वर्षे लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारीही पालिक ा प्रशासनाने त्यावेळी संबंधितांवर निश्चित केली होती; मात्र याचा विसर पडल्याने संताप व्यक्त होत आहे. लावलेल्या रोपांची सुरक्षितता वाºयावर सोडल्यामुळे रोपे लावून केवळ उद्दिष्टपूर्ती केली गेली; मात्र हेतूला हरताळ फासल्याचे बोलले जात आहे. केवळ दहा फूुटाच्या रोपांचे दिलेले ‘टार्गेट’ पूर्ण झाल्यानंतर संबंधितांनी हात वर केल्यामुळे रोपांचे वृक्ष होणार का? असा प्रश्न सकाळ-संध्याकाळ या रस्त्यावरून फेरफटका मारणाºया नागरिकांनी उपस्थित केला आहे. ज्या रोपट्यांची हानी झाली त्याऐवजी पुन्हा नवीन रोपे अद्याप लावली गेली नाही. अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.वर्षभरापूर्वी लागवड; सुरुवातीपासूनच निष्काळजी गेल्या वर्षी वृक्षारोपणासाठी १५ जानेवारी ही डेडलाइन दिली होती. पाच ते सहा खासगी एजन्सींद्वारे यावेळी ‘खड्डे खोदा, रोपे लावा’ अशी मोहीम जिथे जागा मिळेल तिथे राबविण्यात आली. त्यावेळी दोन ते तीन दिवसांमध्येच काही ठिकाणी लावलेल्या रोपांच्या काड्या झाल्या, तर काही ठिकाणी नर्सरीमधील प्लॅस्टिक पिशव्यांसह रोपे खड्ड्यात उभी केल्याचेही वास्तव पुढे आले होते. त्यामुळे महापालिकेकडून करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्चाचे ‘फळ’ नाशिककरांना पहावयास मिळेल का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. सर्वच रिंगरोडलगत लावलेल्या झाडांपैकी बहुतांश झाडे अखेरच्या घटका मोजत आहे. उन्हाळ्यात खºया अर्थाने ही झाडे जगविण्याचे आव्हान राहणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक