भरधाव टेम्पोच्या धडकेत रिक्षाचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 17:46 IST2018-09-09T17:41:18+5:302018-09-09T17:46:14+5:30
नाशिक : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पान दुकानाबाहेर उभा असलेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॅनडा कॉर्नरजवळील शरणपूर - त्र्यंबक लिंकरोड परिसरात घडली. बापू नामदेव उशीरे (४०, रा.कुमावतनगर,मखमलाबाद रोड) असे अपघातात मृत्यु झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

भरधाव टेम्पोच्या धडकेत रिक्षाचालक ठार
नाशिक : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पान दुकानाबाहेर उभा असलेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॅनडा कॉर्नरजवळील शरणपूर - त्र्यंबक लिंकरोड परिसरात घडली. बापू नामदेव उशीरे (४०, रा.कुमावतनगर,मखमलाबाद रोड) असे अपघातात मृत्यु झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षाचालक बापू उशिरे हे रात्री दहा वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन कॅनडा कॉर्नर परिसरात गेले होते़ प्रवासी सोडल्यानंतर त्यांनी आपली रिक्षा पॅनासोनिक शोरूमजवळील पार्क केली व जवळील पानस्टॉलवर उभे होते़ यावेळी पाठिमागून भरधाव आलेल्या पिवळ्या रंगाच्या मिनी टेम्पोने (एमएच १५ एफ ३२१०) उशीरे यांना जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या उशिरे यांचा मृत्यू झाला़, तर घटनेनंतर टेम्पोचालक फरार झाला़
या प्रकरणी विकी उशीरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.