शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचे ‘फिटनेस’ आॅडिट

By admin | Updated: July 30, 2014 00:19 IST

!कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल होणार तयार

नाशिक : वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या कामाची उपयुक्तता तपासून ‘अनफिट’ कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखविण्याचा विभागीय आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याचा आधार घेऊन महसूल विभागाने पन्नाशी पार केलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांचे गोपनीय शेरे अहवाल तपासण्याबरोबरच खातेप्रमुखांचे मतही जाणून घेण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. (पान ७ वर)त्यात कामकाजाचा आढावा घेतला असता, त्यावेळी अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्याही कार्यक्षमता तपासून पाहण्याच्या सूचना केल्या होत्या. शारीरिक व मानसिकदृष्ट्या क्षमता खचलेल्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन त्यांना फिटनेस दाखविण्याची एकदा संधी देणे व त्यानंतर त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी, असे आदेशही आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आता प्रत्येक कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यात कर्मचाऱ्याने आजवर केलेली सेवा, त्यात त्याने सिद्ध केलेली गुणवत्ता, रजेचे प्रमाण, वैद्यकीय रजा सवलत, सहकाऱ्यांशी व वरिष्ठांशी असलेली वर्तणूक या बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी आजवर वैद्यकीय रजा घेतल्या असतील त्यांना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून फिटनेस प्रमाणपत्र आणावे लागेल. त्याचबरोबर जिल्हा शासकीय रुग्णालयातूनही तपासणी करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या पातळीवर ही तयारी केली जात असताना दुसरीकडे प्रत्येक खातेप्रमुखालाही त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गुणवत्ता, कार्यक्षमतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. खातेप्रमुखाने आपल्या शिफारशीसह कर्मचाऱ्याबाबतचा गोपनीय प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावयाचे आहेत. ज्या कर्मचाऱ्यांबाबत प्रतिकूल अहवाल प्राप्त झाला, त्याला म्हणणे मांडण्याची एकदा संधी देऊन त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.