शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

168 कोटी जाणार व्याजासह परत

By admin | Updated: July 20, 2014 01:42 IST

168 कोटी जाणार व्याजासह परत

 

नामुष्की : भगूर पालिकेला गुंडाळावी लागणार योजनाविलास भालेराव ल्ल भगूर
घरकुल योजनेसाठीचा भूखंड उपलब्ध करण्यास भगूर नगरपालिकेला अपयश आल्याने या योजनेसाठी पालिकेला प्राप्त झालेला १६८ कोटींचा निधी व्याजासह परत करण्याची सूचना केंद्र सरकारने केलेली आहे. यामुळे राज्यातील पहिल्या पालिकेतील घरकुल योजनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही बारगळला आहे.
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान प्रकल्पांतर्गत दोन वर्षांपूर्वी भगूर नगरपालिकेला घरकुल योजनेसाठी ९५१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या प्रकल्पांतर्गत घरकुल योजना लागू करण्यासाठी भगूर पालिकेची निवड करण्यात आली होती. अशा प्रकारची योजना मिळणारी भगूर पालिका देशातील एकमेव पालिका ठरली होती. पालिकेला या योजनेसाठी १६८ कोटी रुपये प्राप्तदेखील झाले होते. परंतु ज्या जागेवर १८० घरांची घरकुल योजना राबविण्यात येणार होती त्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण दूर करण्यास आणि जागा ताब्यात घेण्यास पालिकेला प्रयत्न करूही अपयश आल्याने योजना बारगळली आहे.
राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रमांतर्गत भगूर गावातील सि.स.नं. ९४५अ/क जागेवर १८० घरकुले बांधण्याची योजना मंजूर झाली होती. या १८० घरांसाठी ९५१ कोटी ५६ लाख रुपये लागणार होते. त्याकरिता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी नगरपालिकेला १६८ कोटी ४५ लाख रुपये अनुदान देऊन १५ आॅक्टोबर २०१२ पासून बांधकाम करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पालिकेने झोपडपट्टीधारकांना घरकुलात घरे दिली जाणार असल्याचे सांगून झोपडपट्टी उठविण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले होते; परंतु झोपडपट्टीधारकांनी मोर्चा काढून न्यायालयात पालिकेविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला होता. मात्र नगरपालिकेच्या मालकीची जागा असल्याने आणि झोपडपट्टीधारकांनाच घरकुले देण्याची योजना असल्याचे सांगून पालिकेच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर पालिकेने पोलीस आयुक्तांना २६ डिसेंबर २०१३, तसेच १ आणि २४ जानेवारी, तसेच २५ मार्च रोजी पालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस आयुक्तांना विनंती पत्र दिले होते.
५ जानेवारी रोजी पोलीस उपआयुक्त डी. एस. स्वामी यांनी भगूरला येऊन झोपडपट्टीची पाहणी करून नागरिकांची बैठकदेखील घेतली होती. मात्र त्यानंतर झोपडपट्टीधारकांनी सहकार्यच न केल्यामुळे अखेर ही योजनाच केंद्राने गुंडाळली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पालिकेला दिलेला १६८ कोटींचा निधी हा व्याजासह पालिकेला परत करावा लागणार आहे. या वृत्तास पालिका प्रशासनाने दुजोरा दिला असला तरी अधिकृतरीत्या कुणीही बोलण्यास तयार नाही.