नाशिक: बनावट ‘शालार्थ आय.डी.’ तयार करून शासनाची फसवणूक आणि आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या गंभीर गुन्ह्यात सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना दि. ०३/१२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई आणि अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हा घोटाळा केल्याचे पोलीस तपासून उघड झाले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस आयुक्त संदिप कर्णिक आणि पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सखोल तपासाचे आदेश दिले होते.
त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या पथकाने तपास करत असताना, कागदपत्रे आणि माहितीच्या आधारे तपास करत सेवानिवृत्त उपसंचालक नितीन उपासनी यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला त्यानंतर उपासनी यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात पोलिसांना आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे त्यानुसार नाशिक पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
Web Summary : Retired Deputy Director Nitin Upasani arrested in Nashik for Shalarh ID scam involving fraudulent activities causing financial losses to the government. Police investigation revealed collusion with other officials. Further investigation is underway to uncover more details.
Web Summary : नाशिक में शालार्थ आईडी घोटाले में सेवानिवृत्त उप निदेशक नितिन उपासनी गिरफ्तार। सरकारी धोखाधड़ी और आर्थिक नुकसान के आरोप। पुलिस जांच में अन्य अधिकारियों की मिलीभगत का खुलासा। मामले की गहन जांच जारी।