शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वधू-वर मेळाव्यास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

कारखाना सुरू करण्याची मागणी नाशिक: निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखाना लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी गोंडेगाव येथील ऊस ...

कारखाना सुरू करण्याची मागणी

नाशिक: निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखाना लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी गोंडेगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी जगन्नाथ दौलत दाते यांनी केली आहे. बनकर पतसंस्था किंवा पिंपळगाव बाजार समिती यापैकी एका संस्थेचा कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी दाते यांनी केली आहे

मंगळसूत्र चोरीचे सत्र पुन्हा सुरू

नाशिक: रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचे प्रकार वाढले आहेत. शहर परिसरा गेल्या काही दिवसात महिलांचे मंगळसूत्र ओरबाडण्याच्या घटना घडल्या असल्याने महिला वर्गाने दुचाकीस्वार अज्ञातांचा धसका घेतला आहे. बाजारपेठेतून गर्दीच्या ठिकाणाहून मंगळसूत्र चोरीस जात असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.

टाकळी मार्गावरील दुर्गंधीचा त्रास

नाशिक: आयनॉक्स सिनेमा सिग्नल चौकातून टाकळीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मलमूत्र वाहून नेणाऱ्या नाल्यातून दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने नागरी वसाहती वाढल्या आहेत. या नागरिकांना दुर्गंधीयुक्त नालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

सय्यदपिंप्री येथील मैदानावर सामने

नाशिक: नाशिक जिल्हा क्रिकेट असोसएशनच्यावतीने आयेाजित हकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सय्यद पिंप्री येथील मैदानावरदेखील करण्यात आल्याने येधील नागरिकांना क्रिकेटचे सामने पाहाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या धर्तीवर मैदान तयार करण्यात आले असून सामने पाहण्यासाठी स्थानिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

निमाणी बसस्थानकात खड्डेच खड्डे

पंचवटी : पंचवटी येथील निमाणी बसस्थानकात खड्डे पडले असून त्यामुळे बसेसचे नुकसान होत आहे. स्थानकात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून खड्डे बुजविण्याची आवश्यकता आहे. सध्या पूर्ण क्षमतेने बसेस सुरू नसल्याने खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू करण्याची गरज आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

रेजिमेंटल समोरील मार्गावर वाहतूक कोंडी

बिटको : नाशिक रोडममधील मध्यवर्ती ठिकाण असलेले रेजिमेंटल चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी रस्त्यापर्यंत वाहन पार्किंग केले जात असल्याने अन्य वाहनधारकांना अडचण होते. गायकवाड मळा रस्त्यावरही अशीच परिस्थिती आहे. या मार्गावरही वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात आहे.