इगतपुरी : तत्वाचे पालन करून विषमुक्त शेतीवर भर देण्यात द्यावा, याकरिता शासन आर्थिक पुरवठा करीत आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी शासन मंचाने प्रॉडक्शन, मार्केटिंग, बॅकिंग या त्रिसुत्रीय पद्धतीचा वापर करावा असे प्रतिपादन संचालक संशोधन महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे डॉ. शरद गडाख यांनी केले.येथील विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी कृषी विभाग यांच्या सुवर्ण मोहत्सवानिमित्ताने ‘आत्मा नाशिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रक्षिक्षण व शिवार फेरी अभियान प्रशिक्षण कार्यक्र मात मंगळवारी (दि.२३) सकाळी शेतकºयांना मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.व्यासपीठावर आमदार निर्मला गावित, संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे डॉ.किरण कोकाटे, सहयोगी संशोधन संचालक इगतपुरीचे डॉ. डी. बी.कुसळकर, संचालक डॉ. आप्पा वानखेडकर, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. संजय सुर्यवंशी उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.या वेळी डॉ. किरण कोकाटे यांनी बोलतांना सांगितलेकी, पारंपारिक पद्धतीने उत्पन्नात घट येते असल्याने आर्थिक सुब्बता आणण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरून कौशल्यपूर्ण प्रशिक्षणासाठी विद्यापीठात शेतकºयांनी महिन्यातून एकदा भेट देणे गरजेचे आहे.शेतकºयांना विविध प्रकारच्या पिकांवरील रोग व कीड नियंत्रण विषयी सहायक प्राध्यापक एस. आर. परदेशी यांनी माहिती दिली तसेच सहयोगी प्राध्यापक के. पी. देवळणकर भात लागवड विकसित तंत्रज्ञान, नागली, वरई, खुरासणी कडधान्य बाबत माहिती के. डी. भोईटे यांनी दिली. तर कनिष्ठ संशोधक डॉ. प्रमोद बेलेकर ह्यांनी संशोधन केंद्रावरील भाताच्या वेगवेगळ्या जातींची माहिती देऊन भाताच्या नवनवीन जातीच्या निर्मितीची प्रक्रि या व संशोधन कार्यासंदर्भात माहिती दिली.मान्यवरांच्या उपस्थितीत शिवार फेरी दरम्यान शेतकºयांना वेगवेगळे विकसित भाताच्या वेगवेगळ्या जातींची माहिती देण्यात आली. इगतपुरी कृषी संशोधन केंद्रातील नवीन विकसित वाणाच्या निर्मितीसाठी करण्यात येणाºया वेगवेगळ्या चाचण्यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. भात पिकांच्या प्रमाणित बियाणे, मूलभूत बियाणे व पायाभूत बियाणांविषयी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी बी. जी. झडे, पी. एस. बेलेकर, पांडुरंग डावखर आदींनी प्रयत्न केले.कार्यक्र माचे सूत्रसंचालन बी. डी. रोमाडे, तर आभार डॉ. योगेश पाटील यांनी मानले.
कृषी मार्गदर्शन शिबीराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 19:31 IST
इगतपुरी : तत्वाचे पालन करून विषमुक्त शेतीवर भर देण्यात द्यावा, याकरिता शासन आर्थिक पुरवठा करीत आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी शासन मंचाने प्रॉडक्शन, मार्केटिंग, बॅकिंग या त्रिसुत्रीय पद्धतीचा वापर करावा असे प्रतिपादन संचालक संशोधन महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे डॉ. शरद गडाख यांनी केले.
कृषी मार्गदर्शन शिबीराला प्रतिसाद
ठळक मुद्देशिवार फेरी : इगतपुरी विभागीय कृषी संशोधन केंद्राचा सुवर्ण मोहत्सव