Resolution for General Meeting on CBSE school at Mavipar taluka | नाशकात होणार तालुकास्तरावर ‘सीबीएसई’ शाळा ; मविप्रच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव

नाशकात होणार तालुकास्तरावर ‘सीबीएसई’ शाळा ; मविप्रच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव

ठळक मुद्देनाशिक जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये सीबीएसईच्या शाळामराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वार्षिक बैठकीत ठराव

नाशिक : जिल्हातील शिक्षण क्षेत्रात सुमारे ६० टक्के वाटा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाने तालुकास्तरावर कें द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्नित शाळा सुरू करण्याचा ठराव केला आहे. संस्थेच्या एका सभासदाने ऐनवेळच्या विषयांमध्ये माडंलेल्या ठरावाला सभासदांनी एकमताने मंजुरी दिल्यानंतर तालुकास्तरवर जागा मिळाल्यास सीबीएसई संलग्न शाळा सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, यापैकी पाचोरे वणी व वाकद शिरवाडे या ठिकाणी दोन शाळांचे बांधकाम सुरू असल्याचे संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी स्पष्ट केले. त्यासोबत विद्यार्थी आणि सभासद कल्याणाच्या विविध योजनांचा आढावा सभासदांसमोर सादर करतानाच संस्थेला उत्पन्नापेक्षा दहा कोटींचा अधिक खर्च करावा लागला असून, संस्थेच्या विकासासाठी शंभर कोटींचे कर्ज उचलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सभासदांसमोर स्पष्ट केले. 
राज्यातील दुसºया व जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेची १०५ वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेत रविवारी (दि. ८) खेळीमेळीच्या वातारणात पार पडली. व्यासपीठावर सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांच्यासह कार्यकारी मंडळ सदस्य व सेवक सदस्य उपस्थित होते. प्रारंभी कर्मवीरांचे प्रतिमापूजन झाल्यानंतर सरचिटणीस नीलिमा पवार यांनी २०१८-२०१९ वार्षिक अहवालाचे वाचन करताना संस्थेच्या विस्तार व विकासाविषयी सभासदांना माहिती देत विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश नोंदविणाºया विद्यार्थ्यांचाही उल्लेख केला. दरम्यान, सभासदांनी मागील वर्षाच्या इतिवृत्तासह, हिशोब, ताळेबंद २०१८-२०१९ वार्षिक अहवाल, २०१९-२०चे अंदाजपत्रक, सनदी लेखापालाची नेमणूक आदी विविध विषयांसह ऐनवेळी आलेल्या विषयांनाही एकमताने मंजुरी दिली, यात दाभाडी येथील एका सभासदाने संस्थेला दिलेल्या जमिनीच्या आकारापेक्षा अधिक आकाराचे खरेदीखत झाल्याने उर्वरित जमीन परत करण्याचा ठराव मांडला. त्यावर याप्रक्रियेत तांत्रिक अडचणी असून, त्या दूर करून संबंधित जमीन परत करण्याची तयारी संचालक मंडळाने दाखविली. तसेच संस्थेने गेल्यावर्षी ६४९ कोटी ४० लाख रुपयांचे अंदाजपत्रक जाहीर केले होते. त्यापैकी ६०७ कोटी ७६ लाख रुपये विविध विकास कामांसह विद्यार्थी कल्याणासाठी खर्च झाल्याचे यावेळी संचालक मंडळाने स्पष्ट केले. दरम्यान, संस्थेत गैरवर्तन करणाºया एकूण २५ शिक्षकांवर कारवाई करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी कार्यकारी मंडळ सदस्य भाऊसाहेब खातळे, अशोक पवार, उत्तम भालेराव, दत्तात्रय पाटील, नामदेव महाले, प्रल्हाद गडाख, दिलीप पाटील, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. जयंत पवार, सचिन पिंगळे, हेमंत वाजे, डॉ.विश्राम निकम, रायभान काळे आदींसह सेवक सदस्य प्रा. नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, नंदा सोनवणे व सभासद उपस्थित होते. 
 

Web Title: Resolution for General Meeting on CBSE school at Mavipar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.