जिल्ह्यातील वस्तीगृह कर्मचारी वेतनापासून वंचित

By Admin | Updated: August 4, 2014 00:56 IST2014-08-03T20:18:38+5:302014-08-04T00:56:36+5:30

जिल्ह्यातील वस्तीगृह कर्मचारी वेतनापासून वंचित

The resident of the district deprived of the employees' wages | जिल्ह्यातील वस्तीगृह कर्मचारी वेतनापासून वंचित

जिल्ह्यातील वस्तीगृह कर्मचारी वेतनापासून वंचित


पेठ : नाशिक ज्ह्यिातील समाजकल्याण विभागांतर्गत विधि अनुदानित वसुतीगृहातील जवळपास साडेपाचशे कर्मचारी तब्बल अकरा महिण्यापासून वेतनाची प्रतिक्षा करत असून त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास१२७ वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे़
विविध शैद्वधिक संस्थांद्वारा निवासी वस्तीगृहे चालवली जातात या अनुदानित वस्तीगृहांमध्ये काम करणारे अधिक्षक, स्वयंपाकी, मदतणीस, चौकीदार यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून वेतन दिले जाते़
आधीच अगदी तुटपूंज्या वेतनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना गत अकरा महिए्यापासून वेतनाची प्रतिक्षा लागली असून यामुळे मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात
येत आहे़ नाशिक जिल्ह्यात एकूण १२७ अनुदानित वस्तीगृह असून यामध्ये साधारण ५५० कर्मचारी काम करतात़
या कर्मचाऱ्यांना शासनाने कोणतीही वेतनश्रेणी न देता मानधन दिले जाते़मात्र तेही वेळेवर मिळत नसल्याने कुटूंबाचा चरितार्थ
कसा भागवावयाचा या विवंचनेत कर्मचारी सापडले आहेत़ तरी यासंदर्भात तात्काळ थकित वेतन अदा करावे अशी मागणी करण्यात येत आहे़

Web Title: The resident of the district deprived of the employees' wages