नाशिक : रेशन दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांना गव्हाऐवजी निकृष्ट मका वितरित करण्यास राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने विरोध दर्शविला असून, निवासी उपजिल्हाधिकाºयांना निकृष्ट दर्जाचा मका भेट देऊन त्याचा निषेध नोंदविला आहे. राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे, कार्याध्यक्ष नगरसेवक सुषमा पगारे, समीना मेमन, शोभा साबळे, सुरेखा निमसे, रंजना गांगुर्डे, पुष्पा राठोड, सुजाता कोल्हे, रजनी चौरसिया, कामिनी वाघ, पंचशिला वाघ, मीना गायकवाड, संगीता गांगुर्डे, सुशीला गायकवाड, शांताबाई सय्यद, रखमाबाई कुचर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन त्यांना निकृष्ट दर्जाचा मका भेट दिला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, शासनाने अतिरिक्त खरेदी केलेला मका गरीब जनतेच्या माथी मारण्यात येत आहे. शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून गव्हाऐवजी मका देण्यात येत असल्याने व मका निकृष्ट दर्जाचा असल्याने गरीब नागरिक हैराण झाले आहेत. रेशन दुकानातून निकृष्ट मक्याची विक्र ी बंद करावी अन्यथा पुरवठामंत्र्यांना निकृष्ट मका खाऊ घालण्याचा इशारा देण्यात आला.
निवासी उपजिल्हाधिकार्याना निकृष्ट मका दिला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:35 IST