शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

परिट-धोबी समाजाला आरक्षणाची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 4:10 PM

जिल्ह्यातून स्वागत : अनुसूचित जातीत समावेशाची प्रक्रिया

ठळक मुद्देराज्यातील धोबी-परीट समाजाचे अनुसुचित जातीचे आरक्षण पूर्ववत लागू करावे, ह्या मागणीसाठी महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा केला होता.

कसबे सुकेणे : राज्यातील धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ववत लागू करावे, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारला केली असून त्यामुळे समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण होणार असल्याने नाशिक शहर व जिल्ह्यात धोबी समाज बांधवांकडून त्याचे स्वागत करण्यात आले.राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यावतीने केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व हक्क मंत्रालयाला राज्यातील धोबी समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करण्याची शिफारस केली असल्याची माहिती समाजाचे प्रदेशाध्यक्ष व आरक्षण समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी दिली आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात या निर्णयाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. राज्यातील धोबी-परीट समाजाचे अनुसुचित जातीचे आरक्षण पूर्ववत लागू करावे, ह्या मागणीसाठी महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा केला होता. मुंबई, दिल्ली, नागपूर येथे वारंवार आंदोलने करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी धोबी जातीचा समावेश दोन जिल्ह्यात अनुसुचित जातीत होता, परंतु राज्य निर्मितीनंतर धोबी समाजाचे हे आरक्षण काढून घेण्यात आले. समाजाचा हा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाने २००१ मध्ये डॉ. भांडे समिती गठित केली होती.निर्णयाचे  स्वागतगेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या समाजाच्या पाठपुराव्याला यश आले असून धोबी समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राला केली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.- राजेंद्र खैरनार , प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ

टॅग्स :Nashikनाशिकreservationआरक्षण