शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सिडको परिसरात प्रजासत्ताकदिन उत्साहात .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

कोरोना योद्धांनी केले ध्वजारोहण सिडको. दौलतनगर येथील डॉ. डी.एस. आहेर प्राथमिक विद्यालय भारताचा प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रमुख ...

कोरोना योद्धांनी केले ध्वजारोहण

सिडको. दौलतनगर येथील डॉ. डी.एस. आहेर प्राथमिक विद्यालय भारताचा प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून शाळेत केंद्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे जिल्हा रुग्णालय या कोरोना योद्धा म्हणून उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये परिसरातील कचरा साफ करणारे घंटागाडी सफाई कर्मचारी यांनादेखील कोरोना योद्धा म्हणून शाळेतर्फे गौरवण्यात आले. याप्रसंगी अंबिका मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील व संदीप पाटील त्याचप्रमाणे आनम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृतिका पाटील व सचिव अशोक पाटील, नीता पाटील, नीलिमा पाटील, भाग्यश्री पाटील, श्याम पाटील व संजय गांगुर्डे, विद्यालयाचे प्रशासनाधिकारी आर.सी. सोनवणे, समन्वयक ह्याळीज शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक देसले व माध्यमिक विद्यालय सिडको मुख्याध्यापक भालेराव उपस्थित होते . याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील यांनी कोरोना योद्धांसाठी कविता सादर केली. सूत्रसंचालन सविता वाघ यांनी केले.

-----------------------

श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ

सिडको : सावतानगर येथे श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाकडून नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयासमोर माजी सैनिक आनंद कापसे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सैनिक दत्तात्रय कुरकुरे, प्रभाग सदस्य नानासाहेब निकम, प्रा. नारायण शिंदे, डॉ. महेश निकम, बाबाजी आहिरे, विजय जाधव, अरुण गवते, भटू मराठे, हरिभाऊ आढाव, बापू जगताप, सचिन पाटील व श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे गोपीनाथ सोनवणे, यशवंत गायकवाड, गंभीर पाटील, जगन्नाथ मालपुरे, अशोक सनान्से, दत्तात्रय मुसळे, सुभाष अमृतकर, सुरेश ओढेकर, भागवत आदी उपस्थित होते.

-----------------------------------

कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात जनजागृती

सिडको: पवननगर येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिननिमित्ताने पर्यावरणपूरक समाज प्रबोधनात्मक गहूच्या रोपापासून २०×५ फूट अक्षरातून गो कोरोना हे अक्षर तयार करून आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयाचे मुख्यध्यापक आप्पा पवार, उपमुख्याध्यापक रवींद्र नवसारे, पर्यवेक्षक युगांधर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त समाज प्रबोधनात्मक गहूच्या रोपा पासून अक्षरातून संदेश देण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यासाठी कला शिक्षक संजय जगताप यांची कल्पना असून क्रीडा शिक्षक उमेश देवरे व संजय कदम आदी उपस्थित होते.