इगतपुरी तालुका नाभिक समाजाचे जिल्हा परिषद उपाध्यक्षांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 07:11 PM2019-09-10T19:11:29+5:302019-09-10T19:12:36+5:30

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील नाभिक समाजातील पारंपारिक सलून व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून सलून दुकानासाठी खर्ु्च्या देण्यात याव्यात अशी मागणी नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्यवंशी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Report to the Zilla Parishad Vice President of Igatpuri Taluka Nuclear Society | इगतपुरी तालुका नाभिक समाजाचे जिल्हा परिषद उपाध्यक्षांना निवेदन

नाभिक समाजाच्या मागण्यांचे निवेदन नयना गावित यांना देतांना सुरेश सुर्यवंशी, निवृत्ती आंबेकर, वाल्मिक शिंदे, लक्ष्मण सोनवणे आदिंसह पदाधिकारी.

googlenewsNext
ठळक मुद्देइगतपुरी तालुक्यातील नाभिक समाजातील कारागीरांनाही सलून दुकानासाठी खुर्च्या दिल्यास त्यांना मोठी मदत

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील नाभिक समाजातील पारंपारिक सलून व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून सलून दुकानासाठी खर्ु्च्या देण्यात याव्यात अशी मागणी नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्यवंशी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी सिन्नर येथे नाभिक बांधवाना सेस निधी अंतर्गत खर्ु्च्या वाटप केल्या हा पॅटर्न महाराष्ट्रात पूर्णपणे गाजला आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नाभिक समाजातील कारागीरांनाही सलून दुकानासाठी खुर्च्या दिल्यास त्यांना मोठी मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे. जिपच्या उपाध्यक्ष नयना गावित यांनी आपण सकारात्मक दृष्टीकोन ठेवून नाभिक समाजातील सर्वच बांधवाना खुर्च्या देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी सुरेश सुर्यवंशी, निवत्ती आंबेकर, वाल्मीक शिंदे, संदीप व्यवहारे, लक्ष्मण सोनवणे, एकनाथ शिंदे, विजय पंडित, राजेंद्र नगरकर, गणेश रायकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Report to the Zilla Parishad Vice President of Igatpuri Taluka Nuclear Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक