देवळाली कॅम्पसाठी पाणी सोडण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:28 IST2019-06-29T00:28:14+5:302019-06-29T00:28:32+5:30
देवळाली कॅम्प शहराची पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

देवळाली कॅम्पसाठी पाणी सोडण्याचे आदेश
देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प शहराची पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी धरणातूनपाणी सोडण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
गुरुवारी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष भगवान कटारिया, नगरसेवक दिनकर आढाव, बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, तानाजी करंजकर आदींंनी मुंबई येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. कॅम्प शहराला एकच दिवस पुरेल एव्हढेच पाणी बंधाऱ्यात उपलब्ध असून, आरक्षित पाणीसाठ्यापेक्षा खूपच कमी पाणी प्रशासनाने उचलले आहे.
परिणामी शिल्लक पाणी साठा उपलब्ध करून देण्याची विंनती केली. त्यानुसार सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान धरणातून पाणी सोडण्यात आल्याचे कटारिया यांनी सांगितले. शनिवारपर्यंत देवळाली कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे़