आध्यात्मिक शिबिरांकरिता नोंदणी सुरू

By Admin | Updated: October 21, 2014 02:01 IST2014-10-19T21:10:24+5:302014-10-21T02:01:05+5:30

आध्यात्मिक शिबिरांकरिता नोंदणी सुरू

Regular registration for spiritual camps | आध्यात्मिक शिबिरांकरिता नोंदणी सुरू

आध्यात्मिक शिबिरांकरिता नोंदणी सुरू

 

नाशिक : विवेकानंद केंद्र या अखिल भारतीय पातळीवरील संस्थेतर्फे दरवर्षी कन्याकुमारी येथे समुद्रकिनाऱ्यालगत योग शिबिराचे व आध्यात्मिक शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदा दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत योग शिबिर व दि. ५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत आध्यात्मिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही शिबिरांकरिता वयोमर्यादा १८ ते ५० अशी आहे. योगासने, गीतेतील कर्मयोग श्लोक पठण, व्यासंगी व्यक्तींची अभ्यासपूर्ण व्याख्याने, खेळ या गोष्टींचा शिबिरात अंतर्भाव असतो. कन्याकुमारी येथे जाण्यासाठी व परत येण्याकरिता रेल्वेचे आरक्षण प्रवासाच्या ६० दिवस अगोदर करावे लागत असल्यामुळे ज्यांना वरील शिबिरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी विवेकानंद केंद्र, रामवाडी येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Regular registration for spiritual camps