शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारे उपबाजारासाठी जागा देण्यास नकार

By admin | Updated: September 6, 2016 23:08 IST

ग्रामसभेत ठराव : पालकमंत्र्यांना निवेदन

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गिरणारे येथील खासगी देवस्थानच्या जागेत उपबाजार सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी गिरणारे ग्रामस्थांनी केली आहे.यासंदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वीस वर्षांपासून गिरणारे येथे खुले टमटा मार्केट भरत आहे. ते खुले मार्केट तसेच सुरू ठेवावे. या मार्केटचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पैसे मिळतात, कुठलेही कमिशन नाही, कुठलीही दादागिरी नाही. नवीन शासन निर्णयानुसार शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतो. या निर्णयामुळे गिरणारे येथे आमचे जे मार्केट सुरू आहे त्याला फायदाच होणार आहे. मात्र बाजार समितीला स्वत:चा स्वार्थ व अर्थकारण साधण्यासाठी गिरणारे येथे उपबाजार सुरू करण्यासाठी देवस्थानची जागा हवी आहे. मात्र ग्रामपंचायतीने ही जागा देण्यास १५ आॅगस्ट २०१६ च्या ग्रामसभेतील ३८ क्रमांकाच्या ठरावानुसार विरोध केला आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला गिरणारे येथे नव्याने उपबाजार सुरू करू देऊ नये, अन्यथा आम्ही ग्रामस्थ आमरण उपोषण करू, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नितीन थेटे, संजय थेटे, लुखाजी थेटे, दत्तात्रय थेटे, निवृत्ती घुले, आत्माराम थेटे, शिवाजी थेटे, संदीप थेटे, बाळासाहेब कसबे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)