उन्हाळ कांदा आवकेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 07:02 PM2019-11-23T19:02:05+5:302019-11-23T19:02:56+5:30

येवला : शेतकऱ्यांनी चाळीत साठविलेला कांदा संपत आल्याने व लाल कांदा येण्यास उशीर असल्याने सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभावाने आतापर्यंतचा उच्चांक प्रस्थापित केल्याचे दिसुन आले.

Reduce summer onion arrivals | उन्हाळ कांदा आवकेत घट

उन्हाळ कांदा आवकेत घट

Next
ठळक मुद्देयेवला : अंदरसुल मार्केट यार्डवर बाजारभावाचा उच्चांक

येवला : शेतकऱ्यांनी चाळीत साठविलेला कांदा संपत आल्याने व लाल कांदा येण्यास उशीर असल्याने सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभावाने आतापर्यंतचा उच्चांक प्रस्थापित केल्याचे दिसुन आले.
कांद्यास देशांतर्गत परदेशात चांगली मागणी होती. सप्ताहात एकुण कांदा आवक ८००१ क्विंटल झाली असुन उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २००० ते ८६०२ रुपये तर सरासरी ६७०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक ३७९ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २००० ते ८५०० रुपये तर सरासरी ६१६१ प्रति क्विंटल पर्यंत होते.
सप्ताहात गव्हाची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहील्याने बाजारभाव स्थिर होते. गव्हाची एकुण आवक ३१ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १९०० ते कमाल २२१६ तर सरासरी २०५० रुपयांपर्यंत होते.
बाजरीची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात बाजरीची एकुण आवक २६९ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १४०० ते कमाल २४११ तर सरासरी १५५१ पर्यंत होते.
सप्ताहात मुगाची एकुण आवक ५३ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ३५०० ते कमाल ६५०० रुपये तर सरासरी ५६०० रुपयांपर्यंत होते. सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सोयबीनची एकुण आवक २७४ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३००० ते कमाल ३८५२ तर सरासरी ३७०१ रुपयांपर्यंत होते.
सप्ताहात मकाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. मकास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मक्याची एकुण आवक ३७५३९ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १३०० ते कमाल १७४२ रुपये तर सरासरी १५००० प्रति क्विंटल पर्यंत होते.
तसेच उपबाजार अंदरसुल येथे मक्याची एकुण आवक ८५९३ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १३०० ते कमाल १७७९ रुपये तर सरासरी १५५१ प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार पाटोदा येथे मक्याची एकुण आवक ४७८१ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १३०० ते कमाल १७५३ रुपये तर सरासरी १६५० प्रति क्विंटल पर्यंत होते.
याप्रमाणे माहिती बाजार समितीचे प्रशासक सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.
 

Web Title: Reduce summer onion arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.