शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

लालपरी असुरक्षित; अग्निशमन यंत्र गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST

सिन्नर (शैलेश कर्पे) : अलिकडे राज्यात एसटी बसेसना आग लागल्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिन्नर येथील एसटी महामंडळाच्या ...

सिन्नर (शैलेश कर्पे) : अलिकडे राज्यात एसटी बसेसना आग लागल्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिन्नर येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकावर व आगारामध्ये काही बसेसची पाहणी केली असता एसटीची बाहेरुनच नव्हे तर आतूनही दूरवस्था झाल्याचे चित्र होते. अनेक एसटी बसमधील अग्निशमन यंत्रच गायब होते. दहा बसची पाहणी केल्यानंतर पाच बसमध्ये अग्निशमन यंत्र नव्हते. तर उर्वरित ज्या बसमध्ये अग्निशमन यंत्र होते, त्यातील वायू कधी बदलेला असेल हे सांगणेही अवघड आहे. कुठेतरी अडगळीला पडलेला अग्निशमन यंत्र शोधल्यानंतर लवकर सापडत नव्हते.

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र, खिळखिळ्या झालेल्या बसेस, फर्स्ट एड बॉक्सचा नावापुरतेच आणि सोयी-सुविधांचा असलेला अभाव यामुळे लालपरी खरंच सुरक्षित आहे का याबाबत प्रश्न निर्माण होतो. ज्या बसमध्ये अग्निशमन यंत्र होते त्याची मुदतही संपली असल्याची दाट शक्यता होती.

सिन्नर बसस्थानक नाशिक-पुणे महामार्गावरील सर्वात मोठे आणि हायटेक बसस्थानक म्हणून ओळखले जाते. अनेकांना सिन्नर बसस्थानक पाहण्याची भुरळ पडली होती. विमानतळ भासावे असे काहीसे बसस्थानक गेल्या पाच वर्षात काहीसे खराब झाले आहे. स्वच्छता आणि इतर बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचेही दिसून येते. या बसस्थानकात मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी, अहमदनगर, पंढरपूर, तुळजापूर यासह राज्यातील अनेक मोठ्या शहरातील व धार्र्मिक ठिकाणाहून येणाºया बसेसची ये-जा असते. अलिकडे राज्यात अनेक बसेसला आग लागल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर बसमध्ये असणारे अग्निशमन यंत्र व फर्स्ट एड बॉक्स आहे का याची पाहणी ‘लोकमत’ ने केली. मात्र निम्या बसमध्ये अग्निशमन यंत्र आढळून आले नाही तर फर्स्ट एड बॉक्स नावापुरतेच असल्याचे दिसून आले.

अचानक बसला आग लागल्यानंतर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे याकडे एसटी महामंडळाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आता काही दिवसांनी उन्हाळा सुरु होत आहे. उन्हाचा पारा वाढत जाऊन आगीच्या घटनेत वाढ होतात. जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक बसेसने ये-जा करतात. अनेक बसमध्ये अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धगेवर प्रवास करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षितेचा दृष्टिकोनातून अग्निशमन यंत्र बसविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

चौकट-

या बसेसमध्ये अग्निशमन यंत्र नाही

१) नाशिक-पुणे (एम. एच. ०९ एस. ८२१३)

२) कोपरगाव-नाशिक ( एम. एच. ४० एन. ८८५१)

३) सिन्नर-सोमठाणे (एम. एच. २० डी. ९०५१)

४) सुरत-पुणे (एम. एच. १४ बी. टी. ४३९७)

५)नाशिक-पुणे (एम. एच. १४ बी. टी. ३२५६)

-----------

प्रथमोपचार पेट्या नावापुरत्याच

एखाद्या वेळेस अपघात किंवा दुर्घटना घडली तर बसमध्ये प्रथमोपचार पेटी असते. परंत बसमध्ये असलेल्या पेट्या रिकाम्याच होत्या. अनेक प्रथमोपचार पेट्या तुटून पडलेल्या दिसून आल्या. काही बॉक्स फुटलेले तर काही केवळ दोरीने बांधून ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे एखादा प्रवासी बसमध्ये किरकोळ जखमी झाला तर त्याला प्रथमोपचार करण्यासाठी बस थेट रुग्णालयात घ्यावी लागेल. किमान प्रथमोपचार पेटी असून बस रुग्णालयात नेईपर्यंत त्यावर काही प्रमाणात का होईना उपचार करण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने सदर प्रथमोपचार पेटी व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.

--------------

आगार बनले पार्किंग झोन; आओ जाओ घर तुम्हारा

सिन्नर आगारात पे अ‍ॅण्ड पार्कची चांगली सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र काही फुकटे ग्राहक आपल्या दुचाकी पे अ‍ॅण्ड पार्क मध्ये न लावता थेट आगारात नेऊन झाडाखाली लावत असल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याचे सांगून दुचाकी थेट आगारात पार्किंग केल्या जातात. याठिकाणी सुरक्षारक्षक असला तरी या फुकट्या पार्किंग करणाऱ्यांना रोखणे आवश्यक आहे. अन्यथा आओ जाओ घर तुम्हारा अशी अवस्था आहे.

------------

वायफाय सुविधा गायब

काही वर्षांपूर्वी एसटीचे प्रवासी वाढावेत म्हणनू वायफायची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतू ही सेवा केव्हाच गायब झाली आहे. काही महिने वायफायची सुविधा होती. त्यावर प्रवासी ठराविक सिनेमा व मनोरंजन करीत होते. मात्र आता ही सेवा इतिहासजमा झाली आहे. काही दिवसानंतर तर एसटीमधील ही यंत्रणाच गायब झाल्याचे दिसते.

--------------

स्मोकिंग झोन

आगीच्या घटना वाढत असल्या तरी प्रवासी बसस्थानकात विडी-सिगारेट ओढण्यास कचरत नाही. अनेक ठिकाणी धुम्रपान करु नका असे फलक असले तरी त्याकडे दुर्लक्ष करुन लोक विडी-सिगारेट ओढून नियम ढाब्यावर बसवतात. त्यामुळे प्रवाशांनाही त्रास होतो.

-------------

एसटीची आतून दूरवस्था

बसस्थानकात आलेल्या काही बसेसची पाहणी केल्यानंतर त्यांची आतून दूरवस्था झाल्याचेही दिसून आले. स्वच्छता नसणे, सीट फाटणे, बाके तुटलेली असणे, काही ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांकडून पिचकाऱ्या मारल्याचे दिसून आले. अनेकजण बसमध्ये काही खाऊन पाकीटे बसमध्ये टाकून कचरा करतात. अनेकांनी आपली नावे बसच्या बाकावर पाठीमागून लिहून विद्रूप केलेली दिसून आली. प्रत्येकाने आपली स्वत:ची मालमत्ता असल्याचे समजून बसची निगा राखणे गरजेचे आहे.

-----------------

‘सिन्नर आगाराच्या ५८ बसेस आहेत. जवळपास सर्वच बसेसमध्ये अग्निशमन यंत्र बसविण्यात आले आहे. मात्र काही बसचे अग्निशमन यंत्र बदलून आणण्यासाठी नाशिकच्या डिव्हिजन ऑफिसला पाठविण्यात आले आहे. १० ते १२ गाड्यांचे अग्निशमन यंत्र बदलून आणण्यासाठी पाठविले आहे. ते आल्यानंतर या बसेसमध्ये बसविण्यात येईल. प्रवाशांची काळजी घेण्यासाठी लवकरच ते बसविण्यात येईल.

सौरभ रत्नपारखी, कार्यशाळा अधीक्षक, सिन्नर आगार.

-------------

१) बसच्या खिडक्यांच्या काचा गळून पडल्या आहेत.

२) बसमध्ये असलेल्या प्रथमोपचार पेट्या तुटून पडल्या आहेत. (२१ सिन्नर बस १/२)

===Photopath===

210221\21nsk_29_21022021_13.jpg

===Caption===

२१ सिन्नर बस १/२