शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे काळाराम मंदिर अलिकडचे, त्यात फार वेगळे आढळणे अशक्यच : दिनेश वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:45 IST

नाशिक-  नाशिककरांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम सध्या सुरू असून त्यात आधी पायऱ्या सापडल्या त्यांनतर आता चबुतरा असल्याचे स्पष्ट झाले. मंदिर पुरातन आणि आकर्षक असल्याने त्याविषयी नाशिककरांना कुतहल वाटले नाही तर नवलच. परंतु संशोधकांच्या मते हे मंदिर दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे असल्याने संशोधन या अनुषंघाने खूप असे जूने नाही. त्यामुळे त्याचे उत्खनन केले तरी सध्या चर्चा असल्याप्रमाणे भुयार किंवा तत्सम प्रकार आढळण्याची शक्यत नाही असे मत नाशिकमधील प्रसिध्द संशोधन आणि व्यास ओरिएंटशन रिसर्च सेंटरचे संचालक दिनेश वैद्य यांनी केले.

ठळक मुद्देमंदिराचे आणि नाथपंथीयांचे अतुट नाते हे मिश्र शैलीचे मंदिर

नाशिक-  नाशिककरांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम सध्या सुरू असून त्यात आधी पायऱ्या सापडल्या त्यांनतर आता चबुतरा असल्याचे स्पष्ट झाले. मंदिर पुरातन आणि आकर्षक असल्याने त्याविषयी नाशिककरांना कुतहल वाटले नाही तर नवलच. परंतु संशोधकांच्या मते हे मंदिर दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे असल्याने संशोधन या अनुषंघाने खूप असे जूने नाही. त्यामुळे त्याचे उत्खनन केले तरी सध्या चर्चा असल्याप्रमाणे भुयार किंवा तत्सम प्रकार आढळण्याची शक्यत नाही असे मत नाशिकमधील प्रसिध्द संशोधन आणि व्यास ओरिएंटशन रिसर्च सेंटरचे संचालक दिनेश वैद्य यांनी केले.प्रश्न: श्री काळाराम मंदिराच्या सुशोभिकरणाच्या निमित्ताने पाय-या आढळल्याने त्याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहे. त्या विषयी नेमके काय सांगाल?वैद्य:  नाशिकचे काळाराम मंदिर हे मुळातच शहराच्या मध्यवर्ती आता आहे. सध्या याठिकाणी पाय-या किंवा चबुतरे खोदकाम करताना आढळले. याविषयी बरीच उलट सुलट चर्चा सुरू असली तरी त्यात तथ्यांचा अभाव आहे. मुळातच हे मंदिर दोनशे ते अडिचशे वर्षांपूर्वीपर्यंतचे आहे. म्हणजे संशोधनाची पार्श्वभूमी बघितली तर त्यादृष्टीने खूप जुने नाही. मंदिराची एकुण रचना बघता मंदिराच्या सर्वच बाजूने जेथे पाय-या आहेत तेथे ओटे (चबुतरे) आणि पाय-या होत्या आणि रहाणारच. मंदिराचा मागील बाजुही खोलगट असल्याने तेथे मात्र तशी सोय नाही. मंदिर बांधताना विशेष काळजी घेतली गेली असून प्रवेशव्दारावरूनच श्री राम, लक्ष्मण सीता यांच्या मुर्तींचे दर्शन होईल अशी रचना असल्याने हा भाग स्वरूपाचा आहे. सध्या सुरू असलेल्या संशोधनात ज्या पाय-या सापडल्याचे सांगितले जाते त्या अलिकडचे म्हणजेच चाळीस पन्नास वर्षांपूर्वी जमिनीचा भाग वर आल्याने खाली दबल्या गेल्या आहेत. त्या आता खोदकामात सापडणे स्वाभाविक आहे. परंतु म्हणून खूप काही सापडले किंवा सापडेल असे वाटत नाही. भुयार देखील या भागात सापडेल असे वाटत नाही.प्रश्न: पुरातत्व विभागाने यात आणखी संशोधन करावे असे वाटते का?वैद्य: माझ्या मते अशाप्रकारच संशोधन पुरातत्व खाते करणार नाही. कारण मंदिर निर्मितीचा काळ हा दोनशे अडीचशे वर्षांपूर्वींचा आहे. किमान हजारेक वर्षांपूर्वीचे मंदिर असते तर त्यात पुरातत्व खात्याने लक्ष घातले असते परंतु आता त्यात फारसे संशोधन होईल असे वाटते नाही.प्रश्न: मंदिराच्या शैली आणि प्राचीनतेविषयी काय सांगाल?वैद्य : नाशिकमधील हा परिसर प्रामुख्याने नाथ पंथीयांच्या ताब्यातील होता.म्हणजे त्यांच्या जमिनी होत्या. मंदिरासाठी जागा देताना रंगराव ओढेकर यांना दिलेल्या सूचनेनुसार त्याचे बांधकाम झाले आहे. या मंदिराचे आणि नाथपंथीयांचे अतुट नाते आहे. त्यामुळे सिंंहस्थात हे मंदिर गाभारा आणि पुजेपलिकडे पुर्णत: नाथ पंथीयांकडे असते. त्यांचा ज्या पध्दतीचा त्यावेळी करार झाला असेल त्या पध्दतीने त्या मंदिराचा त्यावेळी त्यांच्या कडे ताबा दिला जातो. मंदिराचे बांधकाम हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने खास तयार करण्यात आले असून प्रवेशव्दारावर उभे राहील्यावर मंदिरातील मूर्ती दृष्टीस पडतात. किंवा त्याचप्रमाणे सूर्यकिरणे मंदिरातील मूर्तींवर पडतील, अशीच त्याची रचना केली आहे. काहींच्या मते ही मान्सार शैली आहे किंवा हेमाडपंथी शैली आहे असे सांगितले जाते परंतु तसे नसून हे मिश्र शैलीचे मंदिर आहे. मंदिराच्या रचना त्यावरील मूर्ती बघता हे मिश्र शैलीतील बांधकाम आहे. मातीवर दगड रचून मंदिराचे बांधकाम झाले आहे.प्रश्न: या ठिकाणी भुयार आहे किंवा सीता गुंफा संदर्भातील देखील मध्यंतरी अशा चर्चा होत्या, त्याविषयी काय वाटते?वैद्य: १८४०- १८९२ अशा अनेक गॅझेटमध्ये मंदिर तसेच सीता गुंफा याविषयी माहिती आहे. परंतु आता त्यात बराच बदल झाला आहे. सीता गुंफेचे नक्की ठिकाण कोणते याबाबतही मतभिन्नता आहे. सध्याची सीतागुंफेची जागा ही गोसावी समाजाची आहे. तेथून रामशेजपर्यंत खरोखरीच भुयार आहे किंवा नाही, किंवा सीता गुंफेची जागा नक्की कोणती, मैथॉलॉजीकल गोष्टीत ब-याचवेळा तसे असेल असे सिध्द करता येत नाही.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :Nashikनाशिकkalaram templeकाळाराम मंदीर