शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांना धान्याची प्रतीक्षा

By admin | Updated: March 21, 2015 23:29 IST

रेशन दुकानदारांना धान्याची प्रतीक्षा

नाशिक : मार्च महिन्यात मंजूर धान्यापैकी निम्मेच धान्य देणाऱ्या पुरवठा खात्याने गुढीपाडव्यापूर्वी एप्रिल महिन्याच्या धान्यातून उर्वरित धान्य देण्याची घोषणा हवेत विरली असून, शहरातील सुमारे ९० दुकानदारांना आजपावेतो धान्याचा एक कणही मिळालेला नाही, तर ग्रामीण भागातही काही तालुक्यांमध्ये शंभर टक्के धान्य पोहोचले नसल्याचे वृत्त आहे. रेशन दुकानात धान्यच नसल्याने गुढीपाडव्याला चांगले करून खाण्याच्या गोरगरिबांच्या मनसुब्यावर पाणी फिरले गेले आहे. सुरगाणा येथील धान्य घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याचा परिणाम मार्च महिन्यात रेशन दुकानदारांना वाटप करावयाच्या धान्यावर झाला. घोटाळ्यातील धान्याची तूट भरून काढण्यासाठी प्रत्येक तालुक्याला फक्त ५० ते ५५ टक्केच धान्य वितरित करण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने त्यावर सारवासारव करीत माथाडी कामगारांच्या संपाचे कारण पुढे करून धान्य देण्यास अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले. मात्र, सर्व रेशन दुकानदारांना शंभर टक्के धान्य २० मार्चनंतर देण्याचेही जाहीर केले होते. असे असतानाही मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील सुमारे ९० दुकानदारांना संपूर्ण मार्च महिन्यात धान्याचा एक कणही मिळालेला नाही, तर ग्रामीण भागातील आठ तालुक्यांमध्येही पुरेसे धान्य पोहोचलेले नाही. धान्याच्या तुटवड्यामुळे रेशन दुकानदारांना त्याचा फटका बसला असून, शासनाने धान्य उपलब्ध करून दिले; परंतु दुकानदार ते देत नाहीत, अशी भावना शिधापत्रिकाधारकांमध्ये झाली आहे. शहरी भागात दारिद्र्य रेषेखालील व अन्नसुरक्षा कायद्याने पात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या अधिक असून, त्यांच्यात रेशनच्या धान्याबाबत जागरूकता अधिक आहे. ज्या दुकानांना धान्यच मिळालेले नाही, त्यांना शिधापत्रिकाधारक भंडावून सोडत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे. गुढीपाडव्याच्या सणापूर्वीच पुरवठा खात्याने धान्य देण्याचे कबूल केले; परंतु त्याची पूर्तता केली नसल्याची तक्रार आहे. (प्रतिनिधी)