The rate of leafy vegetables increased | पालेभाज्यांचे दर वधारले
पालेभाज्यांचे दर वधारले

ठळक मुद्देपावसाचा फटकाआवक घटल्याने दरात वाढकोथिंबीरीच्या जुडीला १०० ते १५० रुपये भाव

नाशिक : जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे परिणामी बाजारसमितीमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वधारले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा माल पुर्णपणे खराब झाल्याने परिणामी बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटत आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव गगणाला भिडले आहेत. पावसामुळे कोथिंबीरीचे मोठे नुकसान झाल्यामुळे कोथिंबीरीच्या जुडीला १०० ते १५० रुपये भाव मिळत आहे.
        मागील आठवड्यापर्यंत भाज्यांचे दर आटोक्यात होते पण या आठवड्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सर्वच भाज्याची आवक घटली असून परिणामी याचा फटका भाज्यांच्या किंमतीवर होतांना दिसुन येत आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या जेवणातून भाजीपाला गायब होत आहे. ग्राहक भाजीपाला खरेदी करतांना विचार करुन भाजी विकत घेत आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू, टॉमेटोचे यांचे भाव वाढले असल्याने ग्राहक या भाज्यांकडे दुर्लक्ष करत इतर भाज्या घेण्यातच समाधान मानत आहे. भेंडी, चवळीच्या शेंगा, वांगे, गवार, दुधी भोपळा, दोडका, फ्लावर,कोबी यांचे दर कायम आहे. आवक पुन्हा वाढल्यास भाव पुन्हा पुर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

पालेभाज्यांचे दर
कोथिंबीर : १०० ते १५० रुपये जुडी
शेपू : २० ते ३५ रुपये जुडी
पालक : १० ते २० रुपये जुडी
कांदापात : २० ते ३० रुपये जुडी
मेथी : २५ ते ४० रुपये जुडी

जादा पाण्यामुळे तसेच वाहतुकीदरम्यान पावसामुळे भाजीपाला सडत असल्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच शेतकºयांचे नुकसान झाल्याने मार्केटमध्ये हवा तसा भाजीपाला उपलब्ध होत नाही. तसेच आवक घटल्याने मार्केटमध्ये येणाºया जेमतेम भाजीपाल्याला मोठा भाव मिळत असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढले आहे.
गजराबाई गोडसे, भाजीपाला विक्रेती

Web Title: The rate of leafy vegetables increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.