Rapid spread of corona; 'People Curfew' in Kasbe-Suken | कोरोनाचा वेगाने फैलाव; कसबे-सुकेणेत ‘जनता कर्फ्यू’

कोरोनाचा वेगाने फैलाव; कसबे-सुकेणेत ‘जनता कर्फ्यू’

नाशिक : निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे गावात कोरोना आजाराचा वेगाने फैलाव होत आहे. सातत्याने या भागातून रूग्ण आढळून येऊ लागल्याने ग्रामपालिका व व्यापाऱ्यांनी एकत्र येत रविवारपासून (दि.११) जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. पुढील दोन दिवस हा कर्फ्यू पाळला जाणार असून जेणेकरून संक्रमणाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास येथील ग्रामपंचायतीला आहे.

कसबे सुकेणे येथे गेल्या आठवड्यात चार कोरोना बाधित रु ग्ण आढळले , त्यामुळे कसबे सुकेणे येथे खबरदारी म्हणून पुन्हा रविवार, सोमवार असे दोन दिवस जनता करफू पाळण्यात येणार आहे. कसबे सुकेणे शहर व्यापारी आण िग्रामपालिका यांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे- मंगळवारी बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत राहतील ,कसबे सुकेणे हे तालुक्यातील मोठ्या बाजारपेठचे गाव असल्याने परिसरातील दहा ते बारा लहान मोठ्या गावांचे मध्यवर्ती बाजारपेठचे केंद्र असल्याने कोरोना चा धोका वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच गीता गोतराने, उपसरपंच अतुल भंडारे यांनी दिली-

Web Title: Rapid spread of corona; 'People Curfew' in Kasbe-Suken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.