नातेसंबंधातील ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडितेने दिला बाळाला जन्म

By अझहर शेख | Published: April 2, 2024 04:53 PM2024-04-02T16:53:07+5:302024-04-02T16:53:28+5:30

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पीडिता शाळेत गेल्यावर शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्याचा फायदा घेत आरोपी काका हा तिला शाळेत घेण्यासाठी जात होता.

Rape of minor girl taking advantage of family acquaintance; The victim gave birth to a baby | नातेसंबंधातील ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडितेने दिला बाळाला जन्म

नातेसंबंधातील ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडितेने दिला बाळाला जन्म

नाशिक : नातेसंबंधातील ओळखीचा फायदा घेत शाळेत घेण्याच्या बहाण्याने जात पीडित अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मावशीच्या चुलत दिराने तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत पांडवलेणीजवळील एका उद्यानात घेऊन जात मागील वर्षी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भवती केल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात आरोपी व पीडितेचा नात्याने काका असलेल्या वीस वर्षांच्या आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पीडिता शाळेत गेल्यावर शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्याचा फायदा घेत आरोपी काका हा तिला शाळेत घेण्यासाठी जात होता. यानंतर तो पीडितेला दुचाकीने पांडवलेणी भागातील जंगलात फिरण्याच्या बहाण्याने घेऊन जात तेथे वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. २९ मार्च २०२४ साली पीडित अल्पवयीन मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने आईने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी तेथे ती गर्भवती असल्याचे समोर आले. तिने एका स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला. दरम्यान, आईने तिला विश्वासात घेऊन बाळंतपणाबाबत विचारले असता, तिने घडलेला प्रकार कथन केला. आरोपीने तिला धमकावून ठेवत कोणालाही याबाबत सांगू नको, असे सांगितले होते. यामुळे तिने याप्रकरणाची वाच्यता केली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तीच्या नात्यातील वीस वर्षीय आरोपीविरुद्ध बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीचा इंदिरानगर पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Rape of minor girl taking advantage of family acquaintance; The victim gave birth to a baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.