शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे ग्रामिण जिल्हाप्रमुख कांदे यांच्याविरुध्द खंडणी व अपहरणाचा गुन्हा

By admin | Updated: April 3, 2017 18:39 IST

शिवसेनेचे ग्रामिण जिल्हाप्रमुख सुहास कांदे व त्यांच्या साथीदारांविरुध्द व्याजाचे पैसे वसूलीप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : शिवसेनेचे सुहास कांदे व त्यांच्या साथीदारांविरुध्द व्याजाचे पैसे वसूलीप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशाी, गंगापूररोड येथे राहणारे अजय जाखडी यांनी व्याजाने कांदे यांच्याकडून तीस लाख रुपये घेतले होते. या रकमेची परतफेडदेखील करण्यात आली व रकमेवरील तीन लाख ७५ हजार रुपये व्याजाच्या रकमेपैकी एक लाख पाच हजार रुपयेही जाखडी यांनी संबंधितांना दिले आहे. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी संशयित कांदे व त्यांचे साथीदारांनी जाखडी यांने अपहरण केल्याची फिर्याद त्यांची पत्नी उमा जाखडी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. रकमेसाठी संशयित विलास हिरे, फरहान यांनी दबाव वाढविला होता. गेल्या शुक्रवारी महात्मानगर येथे अजय यांना बोलावून घेत त्यांचे अपहरण केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे उमा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या तीघा संशयितांविरुध्द खंडणी वसुली व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदे यांच्याविरुध्द यापुर्वी एका घटनेत खंडणीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून न्यायालयाकडून त्यांनी अंतरीम जामीन मिळविला आहे. दरम्यान, गंगापूर पोलीस ठाण्याकडून जाखडी अपहरण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट-३कडे देण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक नारायण न्याहाळदे अधिक तपास करीत आहेत.