शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

रानडे, आंबेडकर दोघेही श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ

By admin | Updated: October 26, 2016 23:11 IST

नरेंद्र जाधव : माणकेश्वर वाचनालयात व्याख्यान

निफाड : न्या. रानडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनीही देशाला समोर ठेवून जीवनभर आपले सामाजिक कार्य केले. भारताच्या इतिहासात त्यांचे कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन खासदार नरेंद्र जाधव यांनी केले.निफाड येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या वतीने आयोजित खासदार जाधव यांचे ‘न्या. रानडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, प्राचार्य हरिष आडके, प्राचार्य डॉ.पी.व्ही. रसाळ उपस्थित होते. खासदार जाधव पुढे म्हणाले की, न्या. रानडे यांचा कालखंड आधीचा त्यानंतरचा डॉ. आंबेडकर यांचा कालखंड होता. भारतीय समाजात डॉ. आंबेडकर दलितांचे, तर न्या. रानडे हे मवाळ मतवादी मानले गेले. या दोन्ही नेत्यांनी जे काही केले ते देशासाठीच केले. या दोन्हीही महान नेत्यांना राष्ट्रीय नेते म्हणून मान्यता मिळायला हवी. डॉ. आंबेडकर यांचे योगदान किती मोठे होते. त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचे विचार हे सांगण्यासाठी मी देशभरात व्याख्याने देत असून,  मी एकूण १२५ व्याख्यान देशभरात देणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. न्या. रानडे सर्वकालीन थोर पुरुष होते. त्यांनी समाज सुधारण्याचा ध्यास घेतला होता. त्यांच्याकडे सचोटी आणि बुद्धिमत्ता होती. त्यांच्या सुधारणा आणि अर्थविषयक भूमिका बाबासाहेबांनी पुढे नेल्या. बाबासाहेब हे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनीच को-आॅप. फेडरालिझम तसेच केंद्र आणि राज्याबाबतचा आर्थिक मुलाधार आपल्या प्रबंधात मांडला. केंद्राच्या आर्थिक बजेटमध्ये केंद्राला देशातून मिळणारा महसूल त्याचे  केंद्र आणि राज्ये यांच्यात जे वाटप केले जात यातील आर्थिक सूचना ज्या पूर्वी रानडे यांनी सुचवलेल्या होत्या. यातील आर्थिक सूचनांचा विचार करून आंबेडकरांनी पुढे यासंदर्भात काम केले, असेही ते म्हणाले.  बाबासाहेब ब्रिटिश सरकारमध्ये मंत्री असताना कामगारांच्या कामाचे तास बाराहुन आठ केले. तर महीलांना मँर्टिनीटी रजा देण्याचा निर्णय , एम्प्लॉयमेंट एक्सचेंज चा प्रारंभ , देशात पहिला कौशल्य विकास कार्यक्र म आणि पहिला नदी जोड प्रकल्प हे सर्व निर्णय आंबेडकरांनी घेतले होते. बाबासाहेबानी सांगितले की राजकारणात अति व्यक्तिपुजा नकोय अन्यथा लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहित होते. न्या रानडे हे देशातील सर्वात महान थोरपुरु ष आहेत. महात्मा गांधी ,न्या रानडे , बॅरिस्टर जिना या तिघांपैकी थोर महान न्या रानडे हेच असल्याचे आंबेडकरांनी सांगितले होते. प्रामाणकिपणा ,बुद्धिमत्ता, समाज हिताच्या द्दष्टीने प्रेरित असणे, या तीनही गुणांच्या कसोटीचा विचार करता न्या. रानडे हेच थोर महान पुरु ष होते असे म्हटले तेव्हा आंबेडकर यांच्यावर टीका झाली होती.  समाजसुधारणेसाठी फार मोठे ध्येर्य दाखवावे लागते ते ध्येर्य रानडेंनी दाखवलं कारण समाजसुधारणा करण्यासाठी समाजाला आव्हान द्यावे लागते सामाजिक बहिष्कार ओढवून घ्यावा लागतो त्याला समाजात टाळलं जातं या सर्व बाबींना रानडे सामोरे गेले म्हणून न्या.रानडे हे थोर पुरु ष होते असही जाधव म्हणाले .. कार्यक्र माचे सुत्रसंचालन सुनिल कुमावत यांनी केले. राजेंद्र सोमवंशी यांनी आभार मानले.